कोरोना: ६९ टक्के रुग्ण होम क्वारंटीन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:52 IST2020-12-04T04:52:59+5:302020-12-04T04:52:59+5:30

ही घ्या खबरदारी नियमित मास्कचा वापर करा होम क्वारंटीन रुग्णांनी स्वतंत्र खोलीतच राहावे इतरांशी संपर्क टाळावा वारंवार हात धुवावे ...

Corona: 69% of patients are home quarantine! | कोरोना: ६९ टक्के रुग्ण होम क्वारंटीन!

कोरोना: ६९ टक्के रुग्ण होम क्वारंटीन!

ही घ्या खबरदारी

नियमित मास्कचा वापर करा

होम क्वारंटीन रुग्णांनी स्वतंत्र खोलीतच राहावे

इतरांशी संपर्क टाळावा

वारंवार हात धुवावे

वयोवृद्धांची घ्या काळजी

होम क्वारंटीन असलेल्या रुग्णांच्या घरात वयोवृद्ध व्यक्ती असल्यास त्यांची विशेष नीगा राखण्याची गरज आहे. विशेष करून रुग्णांनी त्यांच्यापासून लांब राहणे आवश्यक असून, कुठल्याही वस्तूच्या माध्यमातून कोरोना विषाणू त्यांच्या संपर्कात येणार नाही, याची खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.

अशी आहे स्थिती

एकूण खाटा - ८३९

ॲक्टिव्ह रुग्ण - ५७२

रुग्णालयांत उपचार घेत असलेले रुग्ण - १८३

होम क्वारंटीन रुग्ण - ३८९

ज्या रुग्णांना लक्षणे नाहीत तसेच त्यांच्या घरी सर्व सुविधा उपलब्ध आहे, अशाच रुग्णाला होम क्वारंटीनची परवानगी दिली जाते. अशा रुग्णांच्या नातेवाइकांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे. सांगितलेल्या नियमांचे गांभीर्याने पालन केल्यास स्वत:सह इतरांचाही कोरोनापासून बचाव करणे शक्य होईल.

- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला

Web Title: Corona: 69% of patients are home quarantine!