शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

हद्दवाढीची प्रक्रिया १ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करा!

By admin | Updated: August 18, 2016 02:17 IST

शासनाला राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश

अकोला,दि. १७: राज्यांतील दहा महापालिकांची सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया पाच महिन्यांवर येवून ठेपली आहे. यामध्ये अकोला पालिकेचा समावेश असून, प्रभाग पुनर्रचनेसाठी सर्वच पालिकांना निश्‍चित कालावधी नेमून दिला जाण्याची शक्यता आहे. शहराचा हद्दवाढीचा मुद्दा ध्यानात घेता कोणत्याही परिस्थितीत १ सप्टेंबरपर्यंत हद्दवाढीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने शासनाला दिले आहेत.फेब्रुवारी २0१७ मध्ये अकोला महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक पार पडेल. राज्यांतील दहा महापालिक ांच्या निवडणुकीचा कालबद्ध कार्यक्रम घोषित होण्यापूर्वी प्रभागांची पुनर्रचना होणार आहे. यापूर्वी एका प्रभागात दोन नगरसेवकांचे कामकाज चालायचे. शहरातील ३६ प्रभागात ७३ नगरसेवक आहेत. यातील एका प्रभागात तीन नगरसेवक आहेत. यंदा मात्र एका प्रभागात चार नगरसेवक राहतील. राज्याच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाने चार नगरसेवकांचा मिळून एक प्रभाग असण्यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर अर्थातच आता प्रभागांची पुनर्रचना प्रक्रिया केली जाईल. गुगल नकाशाद्वारे होणारी ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. प्रगणकांनी निश्‍चित केलेली लोकसंख्या व प्रभागांच्या भौगोलिक परिस्थितीवर थेट राज्य निवडणूक आयोगाद्वारे निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आहे. यादरम्यान, अकोला महापालिकेच्या हद्दवाढीची प्रक्रिया सुरू आहे. यासंदर्भात मध्यंतरी नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी बैठक बोलावून मनपा आयुक्त अजय लहाने यांना निर्देशही दिले होते. हद्दवाढीत शहरालगतच्या २४ गावांचा समावेश होणार असल्याने ग्राम विकास विभागाचा अभिप्राय नगर विकास विभागाला प्राप्त झाला आहे. निवडणुकीचा अल्प कालावधी लक्षात घेता १ सप्टेंबरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत हद्दवाढीची प्रक्रिया पूर्ण करण्याची स्पष्ट सूचना राज्य निवडणूक आयोगाने शासनाला केल्याची माहिती आहे.७८0 पेक्षा अधिक प्रगणक गटांची मांडणीमनपाने नियुक्त केलेल्या प्रगणकांच्या माध्यमातून सुमारे ७८0 पेक्षा जास्त प्रगणक गटांची मांडणी नगर रचना विभागाने गुगल मॅपिंगच्या आधारे केली. २0११ च्या जनगणनेतील लोकसंख्येच्या निकषानुसार एका गटात किमान ५00 ते ६00 लोकसंख्येचा समावेश आहे. ही संपूर्ण माहिती नगर रचना विभागाने जमा केल्यानंतर प्रस्तावित प्रभाग रचनेचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केला.कॅबिनेटची मंजुरी बाकीग्राम विकास विभागाने महापालिकेच्या हद्दवाढीला हिरवा कंदील दर्शवला आहे. ग्राम विकास विभागाचा अभिप्राय मुख्यमंत्र्यांकडे जाईल. त्यानंतर मंत्रिमंडळाची मंजुरी अपेक्षित आहे. गावांची माहिती अंतिम टप्प्यातमनपा निवडणुकीच्या अनुषंगाने पालिकेने प्रस्तावित २४ गावांमधील प्रगणक गटांची माहिती जमा करण्याचे काम सुरू केले आहे. आयुक्त अजय लहाने यांनी नगर रचना विभाग व निवडणूक विभागातील कर्मचार्‍यांना तसे निर्देश दिले आहेत.