शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

परंपरागत मतपेढी कायम ठेवत इतर मतांसाठी स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 12:54 IST

विधानसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्ष परंपरागत मतपेढी कायम ठेवण्यावर भर देऊन, इतर मतांची जुळवाजुळव करण्यात व्यस्त असल्याचे दिसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: लोकसभा निवडणुकीसाठी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी परंपरागत दलित मतांंना ओबीसींची जोड देत उभारलेल्या वंचित बहुजन आघाडीमध्ये ‘एमआयएम’चा सहभाग झाल्यानंतर मुस्लीम मतांमध्ये विभाजन होईल, असा कयास होता; मात्र लोकसभा निवडणुकीत एमआयएमची मते वंचित बहुजन आघाडीकडे वळली नसल्याचे चित्र अनेक मतदारसंघात स्पष्टपणे समोर आले. या पृष्ठभूमीवर विधानसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्ष परंपरागत मतपेढी कायम ठेवण्यावर भर देऊन, इतर मतांची जुळवाजुळव करण्यात व्यस्त असल्याचे दिसत आहे.अकोल्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांत मराठा, मुस्लीम, माळी, कुणबी, दलित या समाजांचे प्रमुख मतदान आहे. त्यामुळे साहजिकच मतदारसंघात उमेदवारी देताना तेथील सामाजिक समीकरणांचा प्रत्येक पक्षाने विचार केला आहे. पक्षाची परंपरागत मते, तसेच आपल्या समाजाची मते आपल्यालाच मिळतील, हे गृहीत धरून विजयाचे गणित प्रत्येक उमेदवार मांडत आहे. दलित-मुस्लीम मतांची मोट बांधण्याची अ‍ॅड. आंबेडकरांची खेळी फारशी यशस्वी झाली नसली तरी, मुस्लीम समाजात वंचित बहुजन आघाडीचा चंचूप्रवेश नक्कीच झाला आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने पुढाकार घेत मुस्लीम मते आघाडीकडेच कायम राहतील, अशी व्यूहरचना केली आहे. अकोला पश्चिममध्ये अल्पसंख्याक आयोगाचे राष्टÑीय अध्यक्ष शब्बीर विद्रोही यांनी सभा घेऊन परंपरागत मतपेढीला धक्का बसणार नाही, याची दक्षता घेतली. शरद पवार यांनी बाळापूर मतदारसंघात प्रचार सभा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण केले. दुसरीकडे एमआयएमचे अध्यक्ष ओवेसी यांनी बाळापुरात सभा घेऊन मुस्लीम समाजाला साद घातली. एकीकडे भाजपविरोधी मतांमध्ये आपापला वाटा मजबूत करण्यासाठी स्पर्धा असताना युतीमध्ये मात्र आपले मतदार कायम टिकवून ठेवण्याची कसरत सुरू आहे. भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी १६ आॅक्टोबर रोजी अकोल्यात येत असल्याने भाजपाच्या गोटात उत्साह आहे, तर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाळापूर मतदारसंघातील दौरा रद्द केल्याने शिवसैनिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :AkolaअकोलाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019