हिवरखेड येथून बालकाचे अपहरण

By Admin | Updated: January 3, 2017 01:24 IST2017-01-03T01:24:22+5:302017-01-03T01:24:22+5:30

अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Child abduction from Hiverkhed | हिवरखेड येथून बालकाचे अपहरण

हिवरखेड येथून बालकाचे अपहरण

हिवरखेड, दि. २- येथील इंदिरानगर झोपडपट्टीतून १४ वर्षीय मुलाचे अज्ञात इसमाने अपहरण केल्याची घटना ३0 डिसेंबर रोजी घडली. या प्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. झोपडपट्टीतील न्यायमत खॉ यांच्या फरदीन नावाच्या मुलाला अज्ञात इसमाने ३0 डिसेंबर रोजी पळवून नेले. फरदीन याने टी-शर्ट, काळ्य़ा रंगाची, पॅन्ट परिधान केलेली असून, पायात निळ्य़ा रंगाची चप्पल आहे. या प्रकरणी मुलाची आजी शकीलाबी शेख चांद हिने हिवरखेड पोलिसात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी हिवरखेड पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार प्रेमानंद कात्रे, पोकॉ जगदीश पुंडकर करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Web Title: Child abduction from Hiverkhed