शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री घेणार मनपाचा आढावा

By admin | Updated: August 23, 2016 01:12 IST

बुधवारी मुंबईत बैठक; अकोला मनपाच्या हद्दवाढीक डे नागरिकांचे लक्ष!

अकोला, दि. २२ : महापालिका क्षेत्रात स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत उभारल्या जाणार्‍या वैयक्तिक शौचालयांच्या कामासह राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, घनकचरा व्यवस्थापन आदींसह विविध मुद्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २४ ऑगस्ट रोजी मुंबईत आढावा घेणार आहेत. बैठकीसाठी आयुक्त अजय लहाने उपस्थित राहतील. पालिकेच्या हद्दवाढीवर ठोस निर्णय होण्याचे संकेत असल्याने या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. केंद्र शासनाच्या ह्यस्वच्छ भारतह्णअभियानच्या धर्तीवर राज्य शासनाने ह्यस्वच्छ महाराष्ट्रह्णअभियान सुरू केले. शहरात निर्माण होणारा कचरा,घाणीला आळा घालण्यासाठी शासन आग्रही आहे. उघड्यावर शौच करण्याच्या प्रकारावर कायमस्वरूपी बंदोबस्त म्हणून वैयक्तिक शौचालय उभारण्याचे शासनाचे निर्देश आहेत. मनपा प्रशासनासमोर १0 हजार ७७८ शौचालयाचे उद्दिष्ट आहे. यापैकी ६ हजार ७३ शौचालयांची बांधकामे पूर्ण झाली आहेत. राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत बेघर व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना निवारा उपलब्ध करून देणे, सुशिक्षित बेरोजगारांचा शोध घेऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासह दारिद्रय़ जीवन जगणार्‍या नागरिकांचा शोध घेऊन त्यांना अभियान अंतर्गत लाभ करून देण्याचा समावेश आहे. यांसह विविध मुद्यांचा येत्या बुधवारी मुख्यमंत्री आढावा घेणार आहेत. त्यानुषंगाने मनपा आयुक्त अजय लहाने मंगळवारी मुंबईकडे रवाना होतील. आयुक्तांनी घेतला आढावा वैयक्तिक शौचालय, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, पाणीपुरवठा वितरण प्रणालीची कामे, पंतप्रधान आवास योजनेसह विविध विषयांचा मुख्यमंत्री आढावा घेणार असल्याने महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी संबंधित सर्व विभाग प्रमुखांची सोमवारी त्यांच्या दालनात बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेतला. हद्दवाढ होईल का? येत्या १ सप्टेंबरपर्यंत मनपा हद्दवाढीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने शासनाला दिले आहेत. त्या पृष्ठभूमिवर हद्दवाढीच्या फाइलचा प्रवास वेगात सुरू आहे. मुंबईत आयोजित आढावा बैठकीत मुख्यमंत्री हद्दवाढीसंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे संकेत आहेत.