मध्य रेल्वेच्या प्रवाशांनाही मिळणार पेपरलेस तिकीट

By Admin | Updated: July 11, 2015 01:38 IST2015-07-11T01:38:58+5:302015-07-11T01:38:58+5:30

१५ ऑगस्टपासून सेवा सुरू होण्याचे संकेत

Central Railway passengers will get a paperless ticket | मध्य रेल्वेच्या प्रवाशांनाही मिळणार पेपरलेस तिकीट

मध्य रेल्वेच्या प्रवाशांनाही मिळणार पेपरलेस तिकीट

अकोला : मोबाईलद्वारे उपलब्ध होणारी पेपरलेस तिकीटाची सुविधा रेल्वेच्या चारही विभागात टप्प्या-टप्प्याने सुरू करण्यात येणार असून, मध्य रेल्वे प्रशासन ही सुविधा १५ ऑगस्टपासून सुरू करण्याच्या विचारात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तिकीट खिडक्यांवर लागणार्‍या लांबलचक रांगा, त्यासाठी प्रवाशांचा वाया जाणारा वेळ विचारात घेऊन रेल्वे प्रशासनाने मोबाईलद्वारे ह्यपेपरलेस तिकीटह्ण यंत्रणा विकसित केली. देशातल्या चारही विभागात टप्प्या-टप्प्याने ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत असून, मध्य रेल्वेच्या प्रवाशांना या सुविधेचा लाभ लवकरच मिळणार असल्याची माहिती रेल्वेच्या भुसावळ मंडळ अधिकार्‍यांनी ह्यलोकमतह्णला दिली. मध्य रेल्वे मार्गावर धावणार्‍या गाड्यांवर पूर्वीच्या तुलनेत प्रचंड गर्दी वाढली आहे. नोकरी आणि कामकाजानिमित्त दररोज अप-डाऊन करणार्‍यांचे प्रमाणदेखील जास्त असल्याने या मार्गावरील प्रवाशांना या सुविधेची नितांत गरज आहे.

Web Title: Central Railway passengers will get a paperless ticket