शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

जातीच्या निकषांवर उमेदवारीची खलबते!

By admin | Updated: September 10, 2014 01:14 IST

विधानसभा निवडणूक: अकोल्या जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांची चाचपणी अंतिम टप्प्यात.

मनोज भिवगडे / अकोलाविधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांची सर्वच पक्षांमध्ये झालेली गर्दी बघता, उमेदवारांची जात आणि भाषा विचारात घेऊन मतदारसंघनिहाय खलबते सुरू झाली आहेत. उमेदवारांची चाचपणी अंतिम टप्प्यात असतानाच एकाच पक्षाकडून एकच जात किंवा धर्माचा उमेदवार एकाच जिल्ह्यातील दोन मतदारसंघात दिला जाणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे. आघाडीच्या पातळीवर जाऊन हा विचार सुरू असतानाच उमेदवाराची मातृभाषाही प्रामुख्याने विचारात घेतली जात आहे. अकोला जिल्ह्यातील राजकारण प्रामुख्याने जात आणि धर्मावरच आधारित आहे. मतदारसंघात ज्या जातीची वा धर्माची सर्वाधिक गठ्ठा मतं आहेत, तेथे त्याच जातीचा व धर्माचा उमेदवार देण्याची परंपरा जिल्ह्यात आहे. मतदारांनीही विकासापेक्षा जात-धर्माच्या राजकारणालाच खतपाणी घातले असल्याचे जिल्ह्याचा राजकीय इतिहास बघितल्यास दिसून येते. काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारिप-बमसंकडून उमेदवारांच्या नावावर अद्याप शिक्कामोर्तब करण्यात आले नाही. प्रतिस्पर्धी पक्षाकडून कोणत्या जाती-धर्माचा उमेदवार दिला जातो, याचा कानोसा घेऊन उमेदवारांच्या नावावर खलबते सुरू आहेत. अकोला पश्‍चिम आणि अकोला पूर्व मतदारसंघात शहराचा संपूर्ण परिसर येत असल्याने येथे जात-धर्मासोबतच उमेदवारांच्या भाषेबाबतही विचार केला जात आहे. एका मतदारसंघात हिंदी भाषिक उमेदवार दिल्यास, बाजूच्याच मतदारसंघात हिंदी भाषिक उमेदवार आघाडी किंवा युतीकडून दिला जाण्याची शक्यता नाही. त्यामुळे अकोला पश्‍चिम मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसचा उमेदवार निश्‍चित झाल्यानंतरच अकोला पूर्व मतदारसंघातील उमेदवारावर काँग्रेस आणि भाजप-शिवसेना युतीकडून विचार होईल, हे निश्‍चित. भाजपकडून अकोला पश्‍चिममध्ये गत चार निवडणुकांमध्ये हिंदी भाषिक उमेदवार देण्यात आला होता. काँग्रेसनेही या मतदारसंघात हिंदी भाषिक उमेदवारालाच झुकते माप दिले आहे. त्यामुळे भाजपच्या मित्र पक्षाकडून अकोला पूर्व मतदारसंघासाठी हिंदी भाषिक उमेदवाराच्या नावावर विचार सुरू असला, तरी अंतिम निर्णय अकोला पूर्वमधील भाजपच्या निर्णयावरच अवलंबून राहील. त्यातही वाटाघाटीत शेवटच्या क्षणी हा मतदारसंघ भाजपला सुटला, तर या पक्षाकडून भाषेच्या आधारावरच उमेदवार निश्‍चित केला जाऊ शकतो. काँग्रेसकडून मुस्लीम आणि मराठा, असे दोन पर्याय अकोला पूर्व आणि पश्‍चिम मतदारसंघासाठी विचारात घेतले जात आहेत. या पक्षालाही दोन्ही मतदारसंघात समतोल साधतानाच बाळापूर आणि आकोट मतदारसंघाचाही विचार करावा लागणार आहे. बाळापूर आणि आकोट या दोन्ही मतदारसंघात काँग्रेसकडे माळी आणि मुस्लीम समाजाचा पर्याय आहे. त्यापैकी कोणत्या मतदारसंघात कोणते कार्ड काँग्रेस वापरते, यावरच भारिप-बमसंची उमेदवारी अवलंबून राहणार आहे. बाळापूर मतदारसंघात भाजपपुढेही उमेदवार निवडीचा मोठा पेच आहे. अशा परिस्थितीत भाजप-शिवसेना युतीमध्ये निर्माण झालेला अंतर्गत वाद बाळापूरप्रमाणेच आकोटसाठीही डोकेदुखीचा ठरणार आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात उमेदवार निवडताना युतीला जात-धर्म आणि भाषा या बाबी विचारात घेणे क्रमप्राप्त आहे.