शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

पश्‍चिम विदर्भाला लागणार ४३ लाखावर बीटी कापसाची पाकीट !

By admin | Updated: May 4, 2015 01:22 IST

कृषी विभागाने केले नियोजन.

अकोला : येत्या खरीप हंगामात पश्‍चिम विदर्भातील बीटी कापसाचे क्षेत्र ३0 ते ४0 हजार हेक्टरने घसरण्याची शक्यता असून, कृषी विभागाने उर्वरित क्षेत्रासाठी यंदा ४३ लाख ७५ हजार ८00 बियाणे पाकीटांची व्यवस्था केली आहे. यासोबतच विविध पिकांसाठी जिल्हयांमध्ये बियाण्यांचे नियोजन करण्यात आले आहे.पश्‍चिम विदर्भात कापसाचे सरासरी क्षेत्र १0,१३,६0८ हेक्टर आहे. या भागातील शेतकरी मुख्यत्वे कापूस उत्पादक आहे. तथापि अलिकडच्या दहा वर्षात कापसाचा उत्पादन खर्च परवडत नसल्याने शेतकर्‍यांनी कापूस पीक कमी करू न सोयाबीन पेरणीवर भर दिल्याने अलिकडच्या पाच वर्षात पश्‍चिम विदर्भात कापसापेक्षा सोयाबीनचे क्षेत्र वाढले आहे. येत्या खरीप हंगामासाठी अमरावती,अकोला,बुलडाणा, वाशिम आणि यवतमाळ या पाच जिल्हयासाठी १४ लाख ९२ हजार ९0१ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली जाणार असल्याने कृषी विभागाने नियोजन केले आहे., या क्षेत्रासाठी ५,३५,६१७ क्विंटल बियाणे लागणार असल्याने या बियाण्यांची मागणी केली आहे. विदर्भात धान आणि कापूस ही पारंपरिक नगदी पिके आहेत. धान पिकाला अद्याप पर्याय नसल्याने पूर्व विदर्भातील शेतकरी धान शेती करीत आहे. पण पश्‍चिम विदर्भाला सोयाबीन चा पर्याय सापडल्याने शेतकर्‍यांनी सोयाबीन पेरणीवर लक्ष केंद्रीत केल्याने कापसाची जागा सोयाबीन घेतली आहे. असे असले तरी पारंपापिक असलेले कापसाचे पीक शेतकरी सोडण्यास तयार नाही, या कापसाला वेगळे अधिष्ठान असून,सीतादही, दिवाळीला कापूसरू पी शेतकर्‍यांना घरात लक्ष्मी प्रवेश करीत असल्याची अख्यायीका आहे.त्यामुळे या भागात पीक पॅटर्न बदलविण्याचे कृषी विभागाने अनेक प्रयत्न केले तथापि कापसाचे म्हणावे तेवढे क्षेत्र कमी झाले नाही. दरम्यान, येत्या खरीप हंगामासाठी अकोला जिल्हयाला यावर्षी ४ लाख८३ हजार ८७४ पाकीटांची मागणी करण्यात आली असून, सर्वाधिक मागणी ही यवतमाळ जिल्हयसाठी २0 लाख ३0 हजार ३८४ पाकीट आहे. त्या खालोखाल अमरावती जिल्हा ८ लाख ८८ हजार २५ पाकीट बियाणे लागणार आहे. बुलडाण्याला ७ लाख ७५ हजार ३१५ पाकीट लागणार आहेत. तर वाशिम जिल्हयासाठी १ लाख ९८ हजार २0९ पाकीटांची करण्यात आली आहे. दरम्यान यंदा कोणतेच बियाणे कमी पडणार नाही तसे नियोजन करण्यात आले आहे. बिटी कापूस आणि सोयाबीनचे बियाणे मुबलक असल्याचे विभागीय कृषी सहसंचालक एस आर सरदार यांनी स्पष्ट केले आहे.