शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

वाहून गेलेल्या मुलाचा अखेर मृतदेहच सापडला

By admin | Updated: June 16, 2017 20:41 IST

आपत्कालीन पथकाला एका बालकाला वाचविण्यात यश

लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : १५ जून रोजी मुसळधार पाऊस झाल्याने शहरातील जुनी वस्ती परिसरातील नाल्याला आलेल्या पुरात दोन चिमुकले वाहून गेले होते. घटनेची माहिती मिळताच संत गाडगेबाबा आपत्कालीन पथकाने बालकाचा शोध सुरू केला होता. अखेर १२ तासांनी त्या बालकाचा मृतदेह १६ जून रोजी सकाळच्या सुमारास सिरसो येथील नाल्यामध्ये सापडला. एका बालकाला काही अंतरावर नागरिकांनी वाचवले. १५ जूनच्या सायंकाळी ५.१५ ते ६.१५ च्या दरम्यान शहरात मुसळधार पाऊस झाला. पाऊस थांबल्यानंतर जुनी वस्ती परिसरातील खाटीक पुऱ्यातील नाल्यावर वाहणाऱ्या पाण्याचा आनंद लुटत असताना दोन मुले वाहून गेली होती. त्यांपैकी एका मुलाला हजारीवाडीजवळ वाचविण्यात आले. दुसरा मुलगा मात्र वाहून गेला. त्या मुलाचे नाव मो. साद मो. रफीक असे आहे. घटनेची माहिती मिळताच शासनाचे प्रतिनिधी व आपत्कालीन पथकाने घटनास्थळ गाठून रात्रीच्या १२ वाजेपर्यंत शोधकार्य सुरू ठेवले. नाल्यातील झाडेझुडुपे व आढळून येणारे साप यामुळे मृतकाच्या नातेवाइकांनी शोधकार्य थांबवायला लावले. त्यानंतर आज सकाळीच नव्याने शोधकार्य सुरू केले असता सिरसो येथील पारधी वस्तीजवळ मो. सादचा मृतदेह आढळून आला. आपत्कालीन पथकाने मृतदेह बाहेर काढले. यावेळी उपविभागीय अधिकारी भगवान सैदानी, तहसीलदार प्रभारी डाबेराव, मुख्याधिकारी दादाराव डोलारकर, नायब तहसीलदार फरताडे, मंडळ अधिकारी तेलगोटे, पटवारी भारती, संत गाडगेबाबा आपत्कालीन पथक पिंजर, मूर्तिजापूर आपत्कालीन पथक, समाजसेवक, नगरसेवक आदींची उपस्थिती होती.