भाजप नेते कनक कोटक यांचा अभीष्टचिंतन सोहळा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:14 IST2021-02-05T06:14:44+5:302021-02-05T06:14:44+5:30

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, समाजसेवक, अकोट शहर भाजपचे अध्यक्ष कनकजी कोटक यांच्या ६३ वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन सोहळा कनक कोटक ...

BJP leader Kanak Kotak's aspiration ceremony in excitement | भाजप नेते कनक कोटक यांचा अभीष्टचिंतन सोहळा उत्साहात

भाजप नेते कनक कोटक यांचा अभीष्टचिंतन सोहळा उत्साहात

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, समाजसेवक, अकोट शहर भाजपचे अध्यक्ष कनकजी कोटक यांच्या ६३ वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन सोहळा कनक कोटक मित्रपरिवार व आर्य समाजाच्यावतीने २६ जानेवारीला भवसागर लॉन येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या अभीष्टचिंतन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा संघचालक अ‍ॅड. मोहनराव आसरकर होते तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये आमदार हरिष पिंपळे, नयना मनतकार, नगराध्यक्ष हरिनारायण माकोडे, प्रा. नवनीत लखोटिया, अ‍ॅड. अजित देशमुख, अबरार खॉ, उपाध्यक्ष, न.प. अकोट, नगराध्यक्षा तेल्हारा जयश्रीताई पुंडकर, भाजप तेल्हारा तालुका अध्यक्ष गजानन उंबरकर, भाजप अकोट तालुकाध्यक्ष प्रा. अशोक गावंडे, अध्यक्ष नवदुर्गा माता ट्रस्ट अकोट सुरेश अग्रवाल, ज्येष्ठ नेते मधुकरराव बोडखे, स्वामी स्वतंत्रतानंद सरस्वती प्रचारक आर्यसमाज अकोट, कुसुमताई भगत जिल्हाध्यक्षा महिला आघाडी भाजप, अ‍ॅड. बाळासाहेब आसरकर, विपिनभाई कोटक, राजेश नागमते, माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम चौखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व प्रथम आर्य समाजाच्या वतीने स्वामी स्वतंत्रतानंद सरस्वती व संतोष राऊत यांनी वेदमंत्रांद्वारे कनक कोटक व त्यांच्या सुविद्य पत्नी कुसुमबेन कोटक यांचे पुष्पवर्षावामध्ये अभीष्टचिंतन केले. त्यानंतर सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ‘लोकमत’मध्ये प्रकाशित कोटक यांचे जीवनचरित्र पेजचे विमोचन करण्यात आले. त्यानंतर आलेला सर्व मान्यवरांनी कनक यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. धीरज अढाऊ यांचे म्युझिकल ग्रुपनी गणतंत्र दिनाचे व अभीष्टचिंतन सोहळ्याचे औचित्य साधून देशभक्तिपर गीतेे सादर केली. कार्यक्रमाचे संचालन प्रा. नितीन शेगोकार, तर आभार प्रदर्शन संतोषकुमार राऊत यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता भाजपचे असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक व कनक मित्रपरिवार उपस्थित होता. (वा.प्र.)

१२ बाय १० दोन फोटोसह

Web Title: BJP leader Kanak Kotak's aspiration ceremony in excitement