शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
3
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
4
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
5
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
6
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
7
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
8
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
9
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
10
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
11
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
12
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
13
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
14
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
15
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
16
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
17
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
18
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
19
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
20
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

‘बड वेव्हील’ पोखरतेय तुरीचे पीक

By admin | Updated: October 20, 2014 23:23 IST

‘बड वेव्हील’ अतिसूक्ष्म रूपात तुरीच्या कळ्य़ात राहून त्या पोखरत असल्याने किड नियंत्रणाबाहेरच.

संतोष मुंढे/ वाशिम शेतकर्‍यांचे नगदी पीक म्हणून ओळखले जाणारे तुरीचे पीक ह्यबड वेव्हीलह्ण नावाच्या किडींनी पोखरणे सुरू केले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना उत्पन्नाची हमी देणारे पीकही हातचे जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.साधारणत: स्ट्रॉबेरीवर आढळणारी बड वेव्हील कीड यापूर्वी आंध्र प्रदेश आणि तामीळनाडूत तुरीच्या पिकावरही अल्पप्रमाणात आढळल्याची नोंद आहे. महाराष्ट्रातही या किडीने तुरीचे पीक पोखरण्याचे काम अनेक वर्षांपासून केले आहे. बड वेव्हीलचा धोका व त्याचे दुष्परिणाम वाशिम येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ आणि प्रभारी अधिकारी डॉ. भरत गीते यांच्या निदर्शनास आले असून, त्या पृष्ठभूमीवर यासंदर्भात कृषी तज्ज्ञांनी शेतकर्‍यांचे प्रबोधन करण्याची गरज आहे. साधारणत: या पिकाला पाच ते सहावेळा बहर येतो. त्यामुळे पहिला बहर गळून पडला, तरी दुसरा येईल, तोही गेला तर तिसरा, चौथा किंवा पाचवा बहर येईल, या आशेवर शेतकरी विसंबून असतात; परंतु पिकाची काळजी घेतल्यानंतरही फूलगळ किंवा कळी गळण्याचे प्रमाण रोखणे का शक्य होत नाही, हे आजवर कोडेच होते. शास्त्रज्ञ गीते यांनी शेतकर्‍यांच्या या समस्येवर शोध मोहीम हाती घेतली. अतिसूक्ष्म रूपात तुरीच्या कळ्य़ात राहून त्या पोखरण्याचे काम ह्यबड वेव्हीलह्ण करीत असल्याचे डॉ. गीतेंना या शोध मोहिमेतून लक्षात आले. साधारणत: स्ट्रॉबेरीवर आक्रमण करणारी प्रमुख कीड म्हणून बड वेव्हीलकडे पाहिले जाते. ही कीड तुरीच्या कळय़ा आतून पोखरण्याचे काम करते. त्यामुळे कळय़ा गळून पडतात. कळय़ा व फुलगळीमागचे हे कारण स्पष्ट झाल्यानंतर, हा धोका तुरीचे पीक संपविण्यासाठी किती प्रमाणात कारणीभूत आहे, याची पाहणी करण्यात आली.सोयाबीन पीक हातचे गेल्याने शेतकर्‍यांना तुरीच्या पिकाकडून आशा आहेत. आता तुरीच्या पिकावरही बड वेव्हील व इतर किडींनी आक्रमण केल्याने शेतकरी पूरता गांगरून गेला आहे. स्ट्रॉबेरीवरील कीड तूर नष्ट करीत असल्याचे निदर्शनास आले असून, यावर उपाययोजना केल्यास शेतकर्‍यांच्या उत्पादनात येणारी घट कमी करणे शक्य असल्याचे येथील कृषी संशोधन केंद्राचे .शास्त्रज्ञ तथा प्रभारी अधिकारी डॉ. भरत गीते यांनी सांगीतले.