शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
2
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
3
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
4
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
5
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
6
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
7
Huma Praveen : २ मुलींची जबाबदारी, १० वर्षे नोकरी, ५ वर्षे अपयश; किचनमध्ये केला अभ्यास, सून झाली ऑफिसर
8
LPG ग्राहकांसाठी सूचना! छोटीशी चूक तुम्हाला अडचणीत आणू शकते; सरकार लोकांना का करतंय अलर्ट?
9
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
10
चाणक्य नीती: ऑफिस असो वा घर, प्रगतीसाठी नेहमी लक्षात ठेवा आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले 'हे' १० नियम!
11
महाग सोन्यामुळे भारताची तिजोरी का रिकामी होत चालली आहे?
12
"ट्रम्प ब्रँड विषारी झालाय" म्हणत ट्रम्प टॉवरचा प्रकल्पच गुंडाळला; ऑस्ट्रेलियात बिल्डरकडून 'करेक्ट कार्यक्रम'
13
अजब-गजब सवय... गेली ८ वर्ष एकच अंडरवेयर घालून खेळतोय ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू एडरसन
14
फ्री वायफायच्या नादात चुकूनही करू नका 'हे' काम; अन्यथा एका मिनिटात बँक बॅलन्स होईल झिरो!
15
Palmistry: सरकारी नोकरी, खाजगी नोकरी की व्यवसाय? तुमच्या हातावरील रेषा काय सांगतात? 
16
Video - १ कोटीची नोकरी सोडून अपार्टमेंट्समध्ये करते साफसफाई; म्हणाली, "पैसा म्हणजे स्वातंत्र्य"
17
Tata Altroz CNG AMT: ट्रॅफिकच्या कटकटीतून सुटका, टाटा अल्ट्रोझ सीएनजी ऑटोमॅटिक भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत!
18
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
19
Tata Trusts Row: ३६ वर्षांपूर्वीच्या शेअर ट्रान्सफरवरुन नवा वाद; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांना नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

भारिप-बमसंचे प्रदेश महासचिव दिलीप तायडे कालवश

By admin | Updated: June 25, 2014 01:55 IST

अकोला जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती तायडे यांचे मंगळवारी मुंबई येथे निधन झाले.

अकोला - भारिप-बहुजन महासंघाचे प्रदेश महासचिव दिलीप तायडे यांचे मंगळवारी मुंबई येथे हृदयविकाराने निधन झाले. अकोला जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती तायडे २३ जून रोजी मुंबई येथे खासगी कामाने गेले असता, त्यांची प्रकृती अचानक अत्यवस्थ झाली. त्यांना तातडीने बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान दुपारी ४ वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. बुधवार, २५ जून रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव अकोल्यातील गीतानगर येथील चिराग अपार्टमेंटमध्ये असलेल्या त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवले जाईल. दुपारी ३ वाजता पातूर तालुक्यातील भंडारज येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार होतील. दिलीप तायडे यांच्याकडे भारिप-बमसंचे प्रदेश महासचिवपद होते. त्यांच्या कार्यकाळात पक्षाने वाशिम जिल्ह्यात विस्तार केला होता. जिल्हा परिषद आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी पक्षाची धुरा सांभाळली होती. जिल्ह्यात अँड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वात भारिपची चळवळ रुजविण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या कार्यकाळातच भारिप-बमसंने अकोला जिल्हा परिषदेत सत्ता मिळविली होती. ते समाजकल्याण सभापती असताना अनेक योजना मार्गी लागल्या होत्या. त्यानंतर त्यांना पक्षाने प्रदेशस्तरावरील जबाबदारी सोपविली होती. त्यांना हृदयविकाचाराचा झटका आल्याने ते काही काळ सक्रिय राजकारणापासून दूर राहिले होते. पुन्हा सक्रिय झाल्यानंतर त्यांच्याकडे पक्षाने अनेक महत्त्वाच्या जबाबदार्‍या सोपविल्या होता.