शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
13
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
14
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
15
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
16
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
17
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

बँक कर्मचा-यांच्या संपाने कोट्यवधीचे व्यवहार ठप्प!

By admin | Updated: November 13, 2014 01:17 IST

खातेदार त्रस्त, एटीएमवर लागल्या रांगा.

अकोला : गेल्या काही दिवसांत सलग आणि त्यानंतर एक दिवसाआड आलेल्या शासकीय सुट्या उपभोगून राष्ट्रीयीकृत बँकांच्या अधिकारी-कर्मचार्‍यांनी परत बुधवारी एक दिवसीय देशव्यापी संप पुकारला. संपामुळे बँकांमधील व्यवहार परत ठप्प पडल्याने आधीच सुट्यांमुळे वैतागलेल्या खातेदारांना मनस्ताप सहन करावा लागला. दिवाळीपूर्वी आणि दिवाळीदरम्यान सलग आलेल्या शासकीय सुट्या, त्यानंतर गेल्या आठवड्यात परत एक दिवसाआड आलेल्या सुट्या संपल्यानंतर बँकांमधील आर्थिक व्यवहारांची गाडी रूळावर येणार, तोच बँक कर्मचार्‍यांनी बुधवारी एकदिवसीय देशव्यापी संप पुकारला. दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पेंशन आणि वेतनवाढीसंदर्भात कर्मचार्‍यांचा मागण्या रास्त असल्या तरी एवढय़ा सुट्या उपभोगल्यानंतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी आपल्याच खातेधारकांना वेठीस धरणे कितपत योग्य आहे, अशा प्रतिक्रिया आल्या मार्गी परत जाणार्‍या ग्राहकांनी व्यक्त केल्या. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन अंतर्गत राष्ट्रीय पातळीवरील नऊ संघटनांनी पुकारलेल्या या संपात अकोला शहर व जिल्ह्यातील सर्वच राष्ट्रीयीकृत बँका सहभागी झाल्या होत्या. संपात सहभागी झालेल्या कर्मचार्‍यांनी शासकीय धोरणाविरुद्ध नारेबाजी व घोषणा देत गांधी मार्गावरील बँक ऑफ महाराष्ट्रसमोर निदर्शने केली. यावेळी दिलीप पिरके, श्याम माईनकर, यशवंत आंबेकर, प्रशांत अग्नीहोत्री, अभय कुणकर्णी, सुनील दुर्गे, प्रकाश दाते, अतुल करंबळेकर, माधव मोतलग, बैस, सुधीर देशपांडे, पातोडे, शशी जोशी, प्रमोद पाटील, प्रकाश देशपांडे, मुकुंद देशमुख, राजेंद्र गावंडे आदी कर्मचारी उपस्थित होते.