विदर्भातील शेतक-यांना मिळणार जैवतंत्र केळी,संत्रा रोपे !

By Admin | Updated: January 1, 2015 01:25 IST2015-01-01T01:25:03+5:302015-01-01T01:25:03+5:30

पंदेकृविला मिळाली शासकीय प्रयोगशाळा आणि रोपवाटीका.

Bacterial bananas, orange seedlings to farmers in Vidarbha! | विदर्भातील शेतक-यांना मिळणार जैवतंत्र केळी,संत्रा रोपे !

विदर्भातील शेतक-यांना मिळणार जैवतंत्र केळी,संत्रा रोपे !

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत शासकीय जैवतंत्रज्ञान प्रयोगशाळा मिळाल्याने, विदर्भातील केळी आणि संत्रा उत्पादकांना आता उतीसंवर्धीत रोगमुक्त आणि गुणवत्ताप्राप्त केळी, संत्रा रोपे मिळणे सोपे झाले आहे.
संत्रा हे विदर्भातील पांरपारिक फळ पीक आहे. अलिकडे केळीचे क्षेत्र वाढले असून, पश्‍चिम विदर्भातील अंजनगाव,अकोट या तालुक्यासह बार्शिटाकळी तालुक्यातील शेतकर्‍यांनी मोठय़ाप्रमाणात केळी लागवड केली आहे. पण या दोन्ही फळ उत्पादक शेतकर्‍यांना दज्रेदार व रोगमुक्त रोपे मिळणे कठीणच होते, खाजगी रोपवाटीकामंधून या फळाची महाग रोपे आणून शेतकर्‍यांना लागवड करावी लागत होती. संत्र्याच्या रोपामध्ये अनेकवेळा हिमाचल आदी राज्यातून आणलेल्या गलगल जातीचे मिश्रण होत असल्याने संत्रा उत्पादकांना मोठे नुकसान सहन करावे लागत होते. आता शासकीस स्तरावर रोपवाटीका निर्माण झाल्याने विदर्भातच शेतकर्‍यांना दज्रेदार, शुध्द आणि रोगमुक्त संत्रा व केळीची रोपे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान विभागाला प्रथमच शासकीय जैवतंत्रज्ञान उतीसंवर्धन प्रयोग शाळा मिळाली असून, या प्रयोगशाळेकरीत राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत सहा कोटी रू पये मिळाले आहे. या प्रयोगशाळेच्या इमारतीचे काम झपाट्याने सुरू करण्यात आले आहे. येणारा काळ जैवतंत्रज्ञानाचा असल्याने या कृषी विद्यापीठाने या विषयावर भर दिला असून,या विषयात तज्ञ निर्माण होण्यासाठी, कृषी विद्यापीठाला राज्यातील पहिले पदवी कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय मिळाले असून, कृषी विद्यापीठातंर्गत पदव्यूत्तर अभ्यासक्रमही सुरू केला आहे.

*एनआरसीनंतर डॉ.पंदेकृविला मिळाली प्रयोगशाळा
केंद्र शासनाच्या नागपूर येथील राष्ट्रीय लिंबूवर्गीय (एनआरसी)संशोधन केंद्रानंतर या कृषी विद्यापीठाला ही पहिली जैवतंत्रज्ञान प्रयोगशाळा मिळाली आहे.तथापि या एनआरसीमार्फत र्मयादित रोपांचा पुरवठा होत असल्याने शेतकर्‍यांना रोपे मिळत नव्हती,कृषी विद्यापीठांची प्रयोगशाळा आणि रोपवाटीकेमधून मोठय़ाप्रमाणावर उतीसंवर्धीत रोपांची निर्मीती केली जाणार आहे.

Web Title: Bacterial bananas, orange seedlings to farmers in Vidarbha!