शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

ऑटो चालकांनो, वाहतूक सुरळीत ठेवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 14:44 IST

वाहतूक शाखेचे प्रमुख गजानन शेळके यांनी ऑटो   चालकांची शनिवारी बैठक घेऊन वाहतूकसुरळीत ठेवण्याचे निर्देश दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहरातील रस्त्यांचे तसेच उड्डाणपुलाच्या निर्माणाधीन बांधकामामुळे वाहतुकीला प्रचंड अडथळे निर्माण होत असतानाच ऑटो   चालकही रस्त्यात वाहने उभी करून कोंडी निर्माण करीत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच वाहतूक शाखेचे प्रमुख गजानन शेळके यांनी ऑटो   चालकांची शनिवारी बैठक घेऊन वाहतूकसुरळीत ठेवण्याचे निर्देश दिले. यापुढे रस्त्याध्ये ऑटो   दिसल्यास कठोर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी या बैठकीत दिला.वाहतूक नियमन व दंडात्मक कार्यवाही करून शहरातील वाहतुकीचा प्रश्न सुटणार नाही, हे लक्षात घेऊन वाहतूक शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी शहरातील अशोक वाटिका ते टॉवर चौक रोडवरील ऑटो   चालकांची शनिवारी बैठक घेतली. या बैठकीत ऑटो   चालकांना वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक त्या सूचना केल्या. वाहतूक सुरळीत ठेवण्याकामी सहकार्य करण्याचे आवाहन शेळके यांनी केले. शहरात एकाच वेळी सर्व प्रमुख रस्त्यांचे बांधकाम सुरू असल्याने व वाहतुकीसाठी अरुंद रोड राहिले आहेत.वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांना दररोज खूप धावपळ करावी लागते; परंतु रोडच्या क्षमतेच्या किती तरी जास्त वाहने रोडवर धावत असल्याने व त्यामध्ये ऑटो  संख्या लक्षणीय असल्याने वाहतूक पोलिसांनी कितीही प्रयत्न केला तरीही वाहतूक अधून-मधून खोळंबत असल्याचे दिसून येते. दिवसभर मेहनत घेऊनही वाहतूक पोलिसांना टीका सहन करावी लागत असल्याने वाहतूक शाखेने ऑटो   चालकांची बैठक घेऊन त्यांना उपाययोजना करणे तसेच आवश्यक त्या सूचना केल्या. विशेषकरून अशोक वाटिका ते रेल्वे स्टेशन या प्रमुख मार्गावर बसस्थानक, रेल्वे स्टेशन, न्यायालय तसेच प्रमुख कार्यालये असल्याने वाहतुकीची प्रचंड वर्दळ दिवसभर राहते. याच मार्गावर हजारो ऑटो   धावत असल्याने वाहतूक विस्कळीत होत असल्याने सहकार्य करण्याचे आवाहन वाहतूक शाखेच्यावतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :Akolaअकोलाtraffic policeवाहतूक पोलीस