महिलेवर अत्याचार, पतीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:20 IST2021-07-30T04:20:16+5:302021-07-30T04:20:16+5:30

महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी पतीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. हिवरखेड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या एका ३५ वर्षीय महिलेने ...

Atrocities on women, charges filed against four persons including husband | महिलेवर अत्याचार, पतीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

महिलेवर अत्याचार, पतीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी पतीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

हिवरखेड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या एका ३५ वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार ती अडगाव येथे आईकडे राहत असताना अडगाव येथील भानुदास गावंडे याने तिला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यातून ती गरोदर राहिली. तिने एका मुलीला जन्म दिला. भानुदास गावंडे याने महिलेसोबत लग्न केले. त्यानंतर तो पुण्याला निघून गेला. पती जवळ राहत नसल्याची संधी साधून गावातील सुरेंद्र अभिमन्यू वानखडे, विनोद जगन्नाथ पाचपोर, अब्दुल रहमान अब्दुल खुर्शीद या आरोपींनी तिच्याशी जवळीक निर्माण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यातून ती गरोदर राहिली. तिने एका मुलीला जन्म दिला. महिलेच्या तक्रारीनुसार हिवरखेड पोलिसांनी महिलेच्या पतीसह तीन आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३७६, ४१७, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला.

Web Title: Atrocities on women, charges filed against four persons including husband