शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
3
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
4
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
5
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
6
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
7
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
8
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
9
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
10
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
11
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
12
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
13
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
14
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
15
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
16
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
17
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
18
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
19
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
20
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
Daily Top 2Weekly Top 5

सहायक अभियंता पोलीस कोठडीत

By admin | Updated: June 17, 2015 02:09 IST

हिवरखेड येथील युवा शेतकरी आत्महत्या प्रकरण.

हिवरखेड/तेल्हारा/आकोट : शेतकरी विनोद खारोडे आत्महत्या प्रकरणातील आरोपी सहायक अभियंता संदीप घोडेला न्यायालयाने मंगळवारी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलीस घोडेने आणखी काही शेतकर्‍यांचा विद्युत जोडणीसाठी छळ केला होता काय, याचाही शोध घेणार आहेत. घोडेला हिवरखेड पोलिसांनी सोमवारी नागपूर येथे अटक केली होती. विद्युत जोडणी मिळत नसल्याच्या उद्वेगातून तळेगाव बाजार येथील २४ वर्षीय विनोद खारोडे या शेतकर्‍याने १९ मे रोजी विष घेतले होते. विनोदचे वडील रामदास खारोडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, हिवरखेड पोलिसांनी महावितरणचा सहायक अभियंता संदीप घोडे, उपकार्यअभियंता आर.टी. राऊत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी तपासादरम्यान महावितरणकडून माहिती संकलित केली. काही शेतकर्‍यांचे जबाबही नोंदविले होते. दरम्यान, घोडेचा अटककपूर्व जामीन अर्ज आकोट येथील सत्र न्यायालयाने ९ जून रोजी फेटाळला होता. त्याला मंगळवारी पोलिसांनी आकोट येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी दिलीप मालवीय यांच्या न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचाआदेश दिला. सरकारतर्फे सहायक सरकारी अभियोक्ता भगत यांनी युक्तिवाद केला. यावेळी हिवरखेडचे ठाणेदार भास्कर तंवर उपस्थित होते. *पोलीस घेणार घोडेची झाडाझडती सरकारी वकिलांनी सहायक अभियंता संदीप घोडेच्या पोलीस कोठडीची मागणी केली. आरोपीकडून प्रकरणाचे संबंधित दस्तावेज जप्त करणे आवश्यक असून, आरोपीने आणखी काही शेतकर्‍यांचा छळ केला आहे काय, याचाही शोध घेणे गरजेचे असल्याचा मुद्दा वकिलांनी पोलिसांतर्फे मांडला. तपासादरम्यान आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली असून, सखोल तपासासाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे सरकारी वकील म्हणाले.