शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा कोणत्याही कराराविना चीन दौरा संपला; इराण युद्धावर तोडगा निघालाच नाही
2
उकाड्यातून लवकरच सुटका होणार! मान्सून वेळेआधीच येणार, २६ मे रोजीच केरळात ठेवणार पाऊल
3
इस्रायल-लेबनॉन शस्त्रसंधी ४५ दिवसांसाठी वाढवली; गाझामध्ये हमासचा लष्करप्रमुख ठार
4
आजचे राशीभविष्य - १६ मे २०२६, मोठा आर्थिक लाभ होणार; नवीन कामे पूर्ण होणार
5
रुपया ९६ पार! भारतात महागाईचा उडणार डबलबार, अर्थव्यवस्थेवर दबाव; केंद्र सरकारची चिंता वाढली
6
अग्रलेख: महागाईच्या आगीत तेल! सर्वसामान्यांच्या खिशावरच टाच 
7
मुलाखत: ‘कार्व्हर’, अजूनही लोकांना काही ना काही देतोच!
8
मुंबईची कायदा-सुव्यस्था मनोजकुमार शर्मा यांच्याकडे, सत्यनारायण यांच्याकडे वाहतूक, कुंभारेंकडे गुन्हे 
9
अमेरिकेत अदानींना मोठा दिलासा; अदानी कुटुंब १८ दशलक्ष डॉलरचा दंड भरणार
10
निवडणुका संपताच १६ दिवसांतच भाववाढ; पेट्रोल-डिझेल ३ रुपये महाग, पेट्रोल निर्यातीवर टॅक्स 
11
अबुधाबीकडून भारतात ५ अब्ज डॉलर गुंतवणूक; एलपीजी पुरवठाही करणार
12
लेख: ‘द ग्लिनर्स’- इतक्या साध्या चित्रात खास असं नेमकं काय आहे?
13
विशेष लेख: ‘फॅशन’ उद्योजक खऱ्या कलाकारांची ‘किंमत’ करतात का?
14
मनोविकारांवरील उपचारांचे विद्यापीठ हरपले; डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन 
15
Neet Exam Date: ‘नीट’ पुनर्परीक्षा २१ जूनला; पुढील वर्षीपासून ऑनलाइन
16
भगवान महावीरांची १०८ फूट उंच मूर्ती पाटण्यात उभारणार  
17
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
18
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
19
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
20
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात कोरोनाचा आणखी एक बळी; १७ नवे पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 12:27 IST

शुक्रवार, ७ आॅगस्ट रोजी अकोला शहरातील आणखी एकाचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली.

अकोला : गत चार महिन्यांपासून जिल्ह्यात धुमाकुळ घालत असलेल्या कोरोनाचा कहर सुरुच असून, या संसर्गजन्य आजाराला बळी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शुक्रवार, ७ आॅगस्ट रोजी अकोला शहरातील आणखी एकाचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली. तर १७ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. कोरोनाच्या बळींचा आकडा ११४ वर गेला असून, एकूण रुग्णसंख्या २९०७ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून शुक्रवारी सकाळी आरटीपीसीआर’ चाचणीचे ९६ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये १७ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असून, उर्वरित ७९ अहवाल निगेटिव्ह असल्याचे निदान झाले आहे. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये पाच महिला व १२ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये चार जण बार्शीटाकळी तालुक्यातील महागाव येथील असून, दोन जण बार्शीटाकळी, दोन जण अकोट, दोन जण तेल्हारा तालुक्यातील गाडेगाव येथील आहेत. याशिवाय सिव्हील लाईन, जठारपेठ, जीएमसी वसतीगृह, रामनगर, माधवनगर, दत्त नगर आणि मुर्तिजापूर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

जठारपेठेतील ६१ वर्षीय पुरुषाचा मृत्यू
कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढतच असून, गुरुवारी रात्री ६१ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. हा रुग्ण जठारपेठ येथील रहिवासी असून, त्यांना २८ जुलै रोजी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना गुरुवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला.


४८९ जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २९०७ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल २३०४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ११४ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ४८९ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या