सलामसह चारही आरोपींची कोठडीत रवानगी

By Admin | Updated: July 14, 2015 02:16 IST2015-07-14T02:16:13+5:302015-07-14T02:16:13+5:30

प्रकाशसिंह बिसेन हत्याकांड.

All four accused along with Salam will be sent to jail | सलामसह चारही आरोपींची कोठडीत रवानगी

सलामसह चारही आरोपींची कोठडीत रवानगी

अकोला - शेतीच्या वादातून गाडीखाली चिरडून प्रकाशसिंह बिसेन यांची हत्या करणार्‍या कुख्यात गुंड सलाम खानसह चारही आरोपींना सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. शेतीच्या वादातून रविवार, ५ जुलै रोजी प्रकाशसिंह बिसेन यांची कुख्यात गुंड सलाम खान करीम खान व त्याचे साथीदार शेख इलीयास, विजेंद्र कुरील आणि शेख कय्युमसह आणखी एका अज्ञात आरोपीने कारखाली चिरडून हत्या केली होती. त्यानंतर आकोट फैल पोलिसांनी चारही आरोपींना अटक करून त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. या आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने चारही आरोपींना प्रथम ११ जुलैपर्यंंंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चारही आरोपींच्या पोलीस कोठडीत १३ जुलैपर्यंंत वाढ केली होती. सोमवार, १३ जुलै रोजी या चारही आरोपींची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने सलाम खानसह चारही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

Web Title: All four accused along with Salam will be sent to jail