शहरं
Join us  
Trending Stories
1
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
2
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
3
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
4
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
5
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
6
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
7
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
8
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
9
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
10
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
11
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
12
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
13
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
14
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
15
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
16
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
17
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
18
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
19
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
Daily Top 2Weekly Top 5

मनपाच्या रांगोळी स्पर्धेकडे अकोलेकरांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 13:29 IST

रांगोळी स्पर्धेकडे अकोलेकरांनी तर सोडाच, खुद्द मनपाचे कर्मचारी व त्यांच्या नातेवाइकांनीसुद्धा पाठ फिरविल्याचे समोर आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधत महापालिक ा प्रशासनाच्यावतीने आयोजित रांगोळी स्पर्धेकडे अकोलेकरांनी तर सोडाच, खुद्द मनपाचे कर्मचारी व त्यांच्या नातेवाइकांनीसुद्धा पाठ फिरविल्याचे समोर आले आहे. नियोजनशून्य कारभारामुळे महापालिका प्रशासनावर नामुष्की ओढवली आहे.संपूर्ण देशभरात महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महापालिक ा प्रशासनाच्या आरोग्य विभागाच्यावतीने अकोलेकरांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.२ आॅक्टोबर रोजी सकाळी ९ ते ११ या कालावधीत स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्थानिक अग्रसेन चौक ते दुर्गा चौकपर्यंतच्या मार्गावर स्वच्छता अभियान, झाडे लावा-झाडे जगवा, रेन वॉटर हार्वेस्टिंग, प्लास्टिक बंदी, कापडी पिशव्यांचा वापर, प्लास्टिकमुळे पर्यावरणाचा होणारा ºहास या विषयांवर सर्व वयोगटातील महिला व पुरुष वर्गांसाठी भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेमध्ये सहभाग घेणाऱ्या स्पर्धकांनी स्वत: रांगोळी आणण्याचे आवाहन महापालिकेने केले होते. तसेच नाव नोंदणीसाठी ३० सप्टेंबर व १ आॅक्टोबर रोजी मनपातील आरोग्य विभागात संपर्क साधण्याची सूचना केली होती. स्पर्धेत प्रथम आलेल्या महिला व पुरुषांना प्रथम पुरस्कार तीन हजार रुपये, द्वितीय पुरस्कार दोन हजार तसेच तृतीय पुरस्काराची रक्कम एक हजार रुपये निश्चित करण्यात आली होती. प्रत्यक्षात २ आॅक्टोबर रोजी या स्पर्धेकडे कोणीही फिरकले नसल्याचे समोर आले.नियोजनशून्य कारभाराचा नमुनारांगोळी स्पर्धेसंदर्भात आरोग्य विभाग प्रमुख प्रशांत राजूरकर यांनी मनपातील सर्व विभाग प्रमुखांना पत्र पाठवून अवगत केले होते. आज रोजी मनपा आस्थापनेवर १८०० पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. यातील अवघे तीनशे ते चारशे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबातील प्रत्येकी एका सदस्याने या स्पर्धेत सहभाग नोंदवला असता तर अकोलेकरांना सामाजिक संदेश देता आला असता. प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराचा उत्तम नमुना यानिमित्ताने पाहावयास मिळाला.

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका