शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात नव्या विक्रमाची लढत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 04:40 IST

अकोल्यासाठी नव्या विक्रमांची नोंद करणारी ही निवडणूक आहे.

अकोल्यासाठी नव्या विक्रमांची नोंद करणारी ही निवडणूक आहे. धोत्रे यांनी विजय मिळविला, तर अकोल्यातून सलग चौथ्यांदा जिंकणारे ते पहिलेच ठरतील. आंबेडकर जिंकले, तर काँग्रेससोबत आघाडी न करता विजयी होण्याचा विक्रम करतील. हिदायत पटेल विजयी झाले, तर तीन दशकांनंतर काँग्रेसला यश मिळेल.>विकास, राष्टÑवाद अन् सक्षम नेतृत्वभाजपचे उमेदवार संजय धोत्रे हे सलग तिसऱ्यांदा खासदार आहेत, त्यामुळे केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा मतदारांपर्यंत पोहोचविण्यावर त्यांनी भर दिला. पुलवामा घटना, बालाकोटवरील हल्ला या मुद्द्यांना प्रचारात स्थान देऊन राष्टÑवाद जागृत करण्याचा, तसेच देशाची सुरक्षितता लक्षात घेऊन, मोंदीचेच नेतृत्व सक्षम असल्याचे मतदारांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न प्रचारात करण्यात आल्या.>सरकारचे अपयश; मोदी नकोच !काँग्रसचे उमेदवार हिदायत पटेल यांनी मोदी सरकारच्या योजनांचे अपयश, पूर्तता न झालेली आश्वासने, देशातील सामाजिक एकता धोक्यात अशा मुद्द्यांवर प्रामुख्याने भर दिला. मोदी विरोधात आघाडीसाठी अ‍ॅड.प्रकाश आंबेडकरांनी साथ न देता भाजपाला पोषक अशी भूमिका घेतल्याचा आरोप करून, अल्पसंख्याक समाजाचे मतविभाजन टाळण्यावर भर देण्याचा प्रयत्न केला.>संघ, मोदी विरोध; परिवर्तनाची लढाईवंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी प्रचारात राष्टÑीय स्वयंसेवक संघ व मोदी यांच्या धोरणांच्या विरोधात प्रामुख्याने भर दिला. काँग्रेसच्या बोटचेपी भूमिकेलाही टीकेचे लक्ष्य केले. संविधानाचे राज्य यावे, वंचितांना सत्तेत वाटा मिळावा, याकरिता सामाजिक बदलासाठी परिवर्तनाची लढाई लढत असल्याची साद त्यांनी मतदारांना घातली .>हेही उमेदवार रिंगणातअकोला लोकसभा मतदारसंघात एकूण ११ उमेदवार रिगणात आहेत भाजपा, काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रमुख लढत होत असून, बहुजन समाज पार्टीचे बी. सी. कांबळे, पीपल्स पार्टी आॅफ इंडियाचे अरुण वानखडे, बहुजन मुक्ती पार्टीच्या प्रवीणा भटकर, तसेच अपक्ष उमेदवार म्हणून गजानन हरणे, मुरलीधर पवार, अरुण ठाकरे, प्रवीण कौरपुरीया, सचिन शर्मा हेदेखील रिंगणात आहेत.

टॅग्स :Sanjay Dhotreसंजय धोत्रेakola-pcअकोलाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019