मुष्टियुद्ध स्पर्धेत अकोल्याचा हरी आर्मीवर भारी

By Admin | Updated: August 28, 2015 23:43 IST2015-08-28T23:43:56+5:302015-08-28T23:43:56+5:30

पुणे येथील ७५ व्या राज्यस्तरीय युवा मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत हरिवंश टावरीचे शानदार प्रदर्शन.

Akola's heavy armies in the Boxing Championship | मुष्टियुद्ध स्पर्धेत अकोल्याचा हरी आर्मीवर भारी

मुष्टियुद्ध स्पर्धेत अकोल्याचा हरी आर्मीवर भारी

अकोला: पुणे येथे सुरू असलेल्या ७५ व्या राज्यस्तरीय युवा मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत अकोला क्रीडा प्रबोधिनीच्या हरिवंश टावरी याने शानदार प्रदर्शन करीत आर्मीच्या आनंदजित याचा प्राथमिक फेरीत पराभव केला. राष्ट्रीय पदक विजेता हरिवंश याने ५२ ते ५६ किलो वजन गटात खेळप्रदर्शन केले. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी शुक्रवार, २८ ऑगस्ट रोजी झालेल्या लढतींमध्ये अकोला क्रीडा प्रबोधिनीचा सय्यद साद, सर्मथ पाटील, रोहण पटेकर यांनीदेखील प्रतिस्पर्धीवर विजय मिळवून अकोला क्रीडा प्रबोधिनीचा दबदबा कायम केला. सय्यद साद याने ४६-४९ किलो वजन गटात सातार्‍याच्या अनिल खताळ याला पराभूत केले. सर्मथ पाटील याने जळगावच्या नीलेश बावीस्करवर मात केली. रोहण पटेकर याने पीसीएमसीच्या रोहण कांबळेचा पराभव करीत स्पर्धेवर वर्चस्व सिद्ध केले. रोहणने ७५ किलो वजन गटात प्रदर्शन केले. अकोला क्रीडा प्रबोधिनी संघ राज्य क्रीडा मार्गदर्शक सतीशचंद्र भट्ट यांच्या मार्गदर्शनात स्पर्धेत खेळप्रदर्शन करीत आहे. स्पर्धा ३१ ऑगस्टपर्यंत चालणार आहेत.

Web Title: Akola's heavy armies in the Boxing Championship