शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

अकोला येथे सात-बारा लवकरच होणार ‘ऑनलाईन’!

By admin | Updated: August 18, 2014 01:45 IST

शेतकर्‍यांचा तलाठी कार्यालयाचा फेरा वाचणार

संतोष येलकर / अकोलाह्यई-फेरफारह्ण प्रणाली अंतर्गत महसूल विभागामार्फत जिल्ह्यातील सर्व सात-बारा लवकरच ह्यऑनलाईनह्ण करण्यात येणार आहे. ह्यऑनलाईनह्ण अद्ययावत सात-बारा उपलब्ध होणार असल्याने, त्यासाठी आता शेतकर्‍यांना तलाठय़ांकडे चकरा मारण्याची गरज राहणार नाही. तसेच सात-बारा मिळण्यासाठी होणारा विलंबही लागणार नसल्याने, शेतकर्‍यांचा त्रास कमी होणार आहे.अकोला जिल्ह्यातील सातही तालुक्यातल्या संगणकीकृत ३ लाख ७५ हजार ५९ सात-बारा उतार्‍यांच्या पडताळणीचे काम जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयामार्फत पूर्ण करण्यात आले आहे. त्यामध्ये संगणकीकृत सात-बारामधील माहितीची तपासणी करून, सात-बारा अद्ययावत करण्याचे काम पूर्ण करण्यात आले. सध्या संगणकीकृत सात-बारा संबंधित तलाठी किंवा सेतू कार्यालयाकडून दिला जातो. त्यासाठी शेतकर्‍यांना तलाठय़ांकडे चकरा माराव्या लागतात. त्यामध्ये सात-बारा मिळविण्यासाठी होणार्‍या विलंबाचा त्रासदेखील अनेकदा सहन करावा लागतो. ह्यई-फेरफारह्णप्रणाली अंतर्गत महसूल विभागामार्फत लवकरच जिल्ह्यातील सर्व संगणकीकृत अद्ययावत सात-बारा ह्यऑनलाईनह्ण उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सात-बारासाठी शेतकर्‍यांसह मालमत्ताधारकांना तलाठी आणि सेतू केंद्रांकडे चकरा माराव्या लागणार नाही. घरबसल्या किंवा सोयीच्या ठिकाणी इंटरनेटवर ह्यऑनलाईनह्ण सात-बारा मिळणार आहे. त्यामुळे सात-बारा मिळविण्यासाठी लागणारा वेळ वाचणार असून, त्रासही वाचणार आहे. *फेरफार नोंदही होणार ह्यऑनलाईनह्ण!जमीन खरेदी-विक्री व्यवहारानंतर त्यासंबंधीची फेरफार नोंददेखील सात-बारामध्ये ह्यऑनलाईनह्ण होणार आहे. खरेदी-विक्री व्यवहाराच्या नोंदीची माहिती दुय्यम निबंधक कार्यालयामार्फत ऑनलाईन संबंधित तहसील कार्यालयाकडे पाठविली जाणार आहे. त्या माहितीच्या आधारे तहसील कार्यालयातील विशेष कक्षामार्फत सात-बारामध्ये ऑनलाईन फेरफारची नोंद घेतली जाणार आहे. त्यामुळे शेतकरी व मालमत्ताधारकांना सात-बारातील फेरफार नोंदीसाठी मंडळ अधिकारी किंवा तलाठय़ांकडे जाण्याची गरज राहणार नाही.*१ सप्टेंबरपासून सुरुवात!संगणकीकृत सात-बारा उतार्‍यांची पडताळणीचे काम पूर्ण झाले असून, येत्या १ सप्टेंबरपासून ऑनलाईन सात-बारा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच फेरफार नोंदीदेखील ऑनलाईन करण्यात येणार आहेत. त्यासाठी आवश्यक असलेली माहिती अचूक करून सात-बारा अद्ययावत करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्‍यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना दिल्या आहेत.