Akola: सहा पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह

By नितिन गव्हाळे | Published: April 27, 2023 01:53 PM2023-04-27T13:53:48+5:302023-04-27T13:54:14+5:30

Akola Police News: अकोला पोलिस दलात कार्यरत असलेल्या सहा पोलीस अधिकारी व अमलदारांना २०२२ या वर्षासाठी पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र जाहिर करण्यात आले आहे.

Akola: Six police officers, staff awarded by Director General of Police | Akola: सहा पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह

Akola: सहा पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह

googlenewsNext

- नितीन गव्हाळे

अकोला - महाराष्ट्र पोलीस विभागात विविध प्रकार च्या प्रवर्गामध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल आणि उल्लेखनिय, प्रशंसनीय सेवेबद्दल राष्ट्रपतीचे पोलीस पदक, पोलीस पदक व पोलीस शौर्यपदक प्राप्त अकोलापोलिस दलात कार्यरत असलेल्या सहा पोलीस अधिकारी व अमलदारांना २०२२ या वर्षासाठी पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र जाहिर करण्यात आले आहे.

पोलीस अधिकारी व अंमलदार यांना राष्ट्रपतीचे पोलीस पदक, पोलीस पदक व पोलीस शौर्यपदक प्राप्त झालेल्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना नावासमोर नमूद प्रवर्गामध्ये पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र जाहिर करण्यात आले आहे. यात अकोल्यातील पोलीस निरीक्षक नंदकुमार रामहरी गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू दामोदर खर्चे, सुभाष विठ्ठल पिंजरकर, पोलीस प्रशिक्षण केंद्राचे अलीम अजीम चव्हाण, सुरेश बाबूलाल मांटे, पोलीस हवालदार महेश गोपाल पांडे यांचा समावेश आहे. या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी एका पत्राद्धारश अभिनंदन केले आहे.

Web Title: Akola: Six police officers, staff awarded by Director General of Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.