सहा पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अकोल्यात एकाचीही नियुक्ती नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2020 11:01 AM2020-10-02T11:01:42+5:302020-10-02T11:01:53+5:30

Akola Police News अकोला पोलीस दलातील तब्बल सहा पोलीस अधिकारी बदलून गेले.

Akola Police Transfers of six police officers; No one has been appointed in Akola! | सहा पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अकोल्यात एकाचीही नियुक्ती नाही!

सहा पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अकोल्यात एकाचीही नियुक्ती नाही!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : राज्यातील पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश बुधवारी झाल्यानंतर अकोला पोलीस दलातील तब्बल सहा पोलीस अधिकारी बदलून गेले; मात्र अकोल्यात एकही अधिकारी आला नसल्याचे वास्तव आहे. अकोला जिल्ह्यातून अधिकाºयांचे आउटगोइंग जास्त असून, इनकमिंग झालेला एकही अधिकारी नाही. त्यामुळे सहा पदे रिक्त झाली असून, याचा परिणाम गुन्हेगारीवर होण्याची शक्यता आहे.
तीन उपविभागीय पोलीस अधिकाºयांच्या बदल्या इतर जिल्ह्यात झाल्या आहेत. त्यात मूर्तिजापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले यांची नाशिक ग्रामीणमध्ये त्याच पदावर बदली करण्यात आली. बाळापूरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी सोळंके यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अकोटचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सोनवणे यांची बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे अकोल्यातील तिन्ही महत्त्वाची पदे रिक्त झाली आहेत. याशिवाय जात प्रमाणपत्र पडताळणी विभागात नियुक्त विकास सानप यांची ठाणे ग्रामीणमध्ये उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस प्रशिक्षण केंद्रातील कार्यरत संजय शुक्ला यांना रायगड जिल्ह्यात नियुक्ती मिळाली आहे.
अकोला पोलीस मुख्यालयातील शिवाजी लहू पाटील यांची रत्नागिरी जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे. यावरून अकोला जिल्ह्यातील तब्बल सहा उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाºयांच्या बदल्या झालेल्या असताना अकोल्यात एकाही अधिकाºयाची नियुक्ती झाली नाही.

Web Title: Akola Police Transfers of six police officers; No one has been appointed in Akola!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.