शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
2
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
3
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
4
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
5
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
6
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
7
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
8
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
9
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
10
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
11
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
12
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
13
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
14
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
15
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
16
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
17
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
18
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
19
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
20
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
Daily Top 2Weekly Top 5

कोणीही या अन् वाहने उभी करा; मनपाच्या कार्यालय परिसरात वाहनांची गर्दी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 12:38 IST

नागरिक बिनदिक्कतपणे त्यांची चारचाकी किंवा दुचाकी वाहने मनपा कार्यालय परिसरात उभी करून निघून जात असल्याचे चित्र आहे.

अकोला: शहराच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या महापालिकेच्या कार्यालय परिसरात कर्मचाऱ्यांच्या वाहनांशिवाय बाजारपेठेत खरेदीसाठी येणाºया अकोलेकरांच्या वाहनांची प्रचंड गर्दी झाल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे मनपात धड चालण्यासाठीदेखील जागा नसल्यामुळे या प्रकाराचा मनपा अधिकाºयांसह कर्मचाºयांना वैताग आला आहे. हा प्रकार पाहता मुख्य प्रवेशद्वारावर नियुक्त केलेल्या सुरक्षा रक्षकांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.शहराची प्रमुख बाजारपेठ गांधी रोड परिसरात एकवटली आहे. या ठिकाणी मनपाचे प्रशस्त कार्यालय असल्यामुळे बाजारपेठेत विविध साहित्याची खरेदी करण्यासाठी येणारे नागरिक बिनदिक्कतपणे त्यांची चारचाकी किंवा दुचाकी वाहने मनपा कार्यालय परिसरात उभी करून निघून जात असल्याचे चित्र आहे. आज रोजी मनपामध्ये १ हजार ८०० कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी बहुतांश कर्मचाºयांची नियुक्ती झोननिहाय करण्यात आल्यामुळे मनपाच्या प्रशासकीय कार्यालयांमध्ये गर्दी आढळून येत नाही. अशा स्थितीत मनपाच्या आवारात तीनशे-चारशे नव्हे, तर तब्बल अडीच ते तीन हजार वाहनांची दररोज पार्किंग केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. वाहनांची वाढती संख्या पाहून त्याला तातडीने आळा घालण्याचे सोडून महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी मनपा आवारात अधिकाºयांच्या वाहनांसाठी दोºया बांधून आखणी करीत उर्वरित जागा मोकळी सोडल्याचे चित्र आहे. याचा नेमका उलटा परिणाम झाला असून, उर्वरित खुल्या जागेमध्ये वाहनांची मोठी संख्या पाहावयास मिळत आहे. यामुळे मनपा आवारात धड पायी चालण्यासाठीही जागा शिल्लक नसल्यामुळे या विचित्र प्रकाराकडे लक्ष देऊन प्रशासनाने त्यावर तातडीने तोडगा काढण्याची गरज निर्माण झाली आहे.नगरसेवकांनो, कार्यकर्त्यांना सांभाळा!मनपातील सत्ताधारी असो वा विरोधी पक्षातील पदाधिकाºयांकडे विविध समस्या घेऊन नागरिक येतात. नगरसेवकांच्या दिमतीलादेखील चार-पाच कार्यकर्ते असतात. त्यांना सुरक्षा रक्षकांकडून शिस्तीत वाहने ठेवण्याची सूचना केल्यानंतर त्यांच्याकडून अरेरावीची भाषा केली जाते. यामुळे नाईलाजाने सुरक्षा रक्षक चुप्पी साधणे पसंत करतात. अशा कार्यकर्त्यांना पदाधिकारी व नगरसेवकांनी सूचना करण्याची गरज आहे.व्यावसायिकांची मनमानी; मनपाने निर्णय घ्यावा!महापालिका कार्यालयासमोर कवच आर्केड व इतर व्यावसायिक संकुल आहेत. त्या संकुलांमध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून व्यवसाय थाटणाऱ्या व्यावसायिकांना त्यांची वाहने ठेवण्यासाठी जागाच शिल्लक नाही. संबंधितांच्या संकुलमध्ये पार्किंगसाठी आरक्षित जागेवर दुकाने बांधण्यात आल्यामुळे सदर व्यावसायिक व त्यांच्या प्रतिष्ठानमध्ये काम करणारे असंख्य कर्मचारी यांनी वाहनतळ म्हणून मनपाच्या परिसराचा वापर सुरू केला आहे. या प्रकाराकडे लक्ष देऊन मनपाने ठोस निर्णय घेण्याची गरज आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका