अकोला मनपा आयुक्त महेंद्र कल्याणकर यांची बदली

By Admin | Updated: January 21, 2015 01:14 IST2015-01-21T01:14:03+5:302015-01-21T01:14:03+5:30

प्रभार तूर्तास अप्पर जिल्हाधिका-यांकडेच!

Akola Municipal Commissioner, Mahendra Kalyankar replaces | अकोला मनपा आयुक्त महेंद्र कल्याणकर यांची बदली

अकोला मनपा आयुक्त महेंद्र कल्याणकर यांची बदली

अकोला : मनपा आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांची नागपूर येथे बदली झाली आहे. महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदासाठी त्यांचे नियुक्ती आदेश जारी झाले आहेत. यामुळे मनपाच्या आयुक्तपदाचा प्रभार तूर्तास अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी दिवेकर यांच्याकडेच राहणार असल्याचे स्पष्ट झाले.
आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी १७ फेब्रुवारी २0१४ रोजी मनपाच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली होती. २६ ऑक्टोबर रोजी दोन महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी गेलेले आयुक्त डॉ. कल्याणकर यांनी मनपा आयुक्तपदाचा प्रभार अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी दिवेकर यांच्याकडे सोपवला होता. २३ डिसेंबर रोजी आयुक्तांचे प्रशिक्षण आटोपल्यानंतर ते मनपाचे कामकाज सांभाळतील, असे बोलले जात होते. २0 जानेवारी रोजी डॉ. कल्याणकर अकोल्यात दाखल झाले. यादरम्यान सायंकाळी अचानक त्यांची नागपूर येथे महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाच्या व्यवस्थापकपदी नियुक्ती झाल्याचे समोर आले. कल्याणकर यांच्या कार्यकाळात प्रशासकीय कामकाज गतिमान झाल्याचे दिसून आले. डॉ. कल्याणकरांच्या बदलीमुळे मनपा आयुक्तपदाचा प्रभार अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी दिवेकर यांच्याकडे कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले.

Web Title: Akola Municipal Commissioner, Mahendra Kalyankar replaces