शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

अकोला पूर्ववर भाजपचा दावा!

By admin | Updated: September 8, 2014 00:11 IST

जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या अकोला पूर्व मतदारसंघावर भाजपचा दावा.

अकोला- जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असलेला अकोला पूर्व म तदारसंघावर भाजपने दावा केला आहे. राज्यात वाढवून मागितलेल्या मतदारसंघांमध्ये अकोला पूर्व या मतदारसंघाचा समावेश आहे. त्यातच शिवसेनेकडून तिकिटासाठी सुरू असलेला कलह भाजपच्या पथ्यावरच पडत असल्याने सेनेच्या गोटातूनही हा मतदारसंघ भाजपला देण्याबाबत अनुकूलता दर्शविल्या जाण्याची शक्यता आहे. भाजप आणि शिवसेना यांच्यात युती झाल्यापासून अकोला जिल्ह्यातील आकोट आणि अकोला पूर्व (पूर्वाश्रमीचा बोरगाव मंजू) मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात आहेत. अकोला पश्‍चिम आणि बाळापूरसह मूर्तिजापूर हा राखीव मतदारसंघ भाजपकडे आहे. ग्रामीण भागात शिवसेनेची पकड असल्याने अकोला शहरातील काही भाग व तालुक्यातील बहुतांश भाग असलेला अकोला पूर्व मतदारसंघ शिवसेनेच्या सोयीचा राहिला आहे. असले तरी २0१४ च्या लोकसभा निवडणुकीत याच मतदारसंघातून संजय धोत्रे यांनी मोठी आघाडी घेतली होती. तसेच राज्यात भाजपचे वाढलेले बळ बघता १४ मतदारसंघ शिवसेनेने वाढवून मागितले आहे त. या मतदारसंघांमध्ये अकोला जिल्ह्यातील अकोला पूर्व या मतदारसंघाचाही समावेश आहे. हा मतदारसंघ भाजपला मिळावा म्हणून पक्षाच्या नेत्यांनी दावा केला असला तरी त्याच्या बदल्यात शिवसेना जिल्ह्यात दुसरा कोणताही मतदारसंघ सोडला जाणार नाही. त्यामुळे शिवसेनेकडून भाजपचा हा दावा किती मान्य केला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपने एकीकडे या मतदारसंघावर दावा केला असतानाच दुसरीकडे शिवसेनेकडून या म तदारसंघासाठी उमेदवाराची चाचपणी केली जात आहे. शिवसेनेकडून इच्छुकांची मोठी यादी आहे. जिल्ह्यातील सर्वच प्रमुख नेत्यांनी याच मतदारसंघावर दावा केला आहे. खुद्द उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनावर घेतलेल्या मुलाखतीच्यावेळी याच मतदारसंघातील तिकिटाच्या दाव्यावरून तीन शिवसेना नेत्यांमध्ये ज्येष्ठे नेत्यासमोरच खडाजंगी उडाली होती. नेत्यांमध्ये ितकिटासाठी असलेले ही स्पर्धा बघून शिवसेना नेत्यांनी हा मतदारसंघ भाजपला सोडण्याची भाषाही बोलून दाखविली होती. त्यामुळे भाजपच्या दाव्याला बळ मिळाले आहे. अकोला पूर्व हा मतदारसंघ मित्रपक्ष शिवसेनेच्या ताब्यात असला तरी तो भाजपला मिळावा म्हणून आम्ही प्रस्ताव दिला असल्याचक भाजप जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात यांनी स्पष्ट केले.