शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत सदस्यांच्या मानधन वाढीत अकोला कृषी विद्यापीठाचे निष्कर्ष ठरले महत्त्वाचे!

By admin | Updated: November 12, 2014 23:36 IST

राज्यातील महिला ग्रामपंचायत सदस्यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय.

अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने काढलेल्या निष्कर्षांमुळे राज्यातील महिला ग्रामपंचायत सदस्यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. कृषी विद्यापीठाने शेती विकासासंदर्भातील विविध निष्कर्ष काढून, २0१३ मध्ये शासनाला पाठविले होते. त्यामध्ये ग्रामपंचायत सदस्यांच्या अल्प मानधनाकडे लक्ष वेधण्यात आले होते.स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिलांना स्थान मिळावे, यासाठी वेळावेळी राज्य शासनाने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. ग्रामपंचायत स्तरावर महिला सदस्यांच्या संख्येत वाढ झाली असली तरी, निवडून आलेल्या महिला सदस्यांची ग्रामसभा, तसेच ग्रामपंचायतीच्या सभांमधील उपस्थिती नगण्य असते. नेमका हाच धागा पकडून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण विभागाचे प्रमुख, तथा अधिष्ठाता पदव्यूत्तर शिक्षण डॉ. दिलीप मानकर आणि त्यांच्या सहकार्‍यांनी या संदर्भात संशोधन केले. या शास्त्रज्ञांनी विदर्भातील बुलडाणा व वाशिम जिल्हय़ातील प्रत्येकी चार तालुक्यातील ६0 महिला ग्रामपंचायत सदस्यांची या अभ्यासकरिता निवड केली. अभ्यासासाठी निवडण्यात आलेल्या महिलांपैकी ५८.३४ टक्के महिला ३६ ते ५0 वयोगटातील, तर २८.३३ टक्के या ३५ वर्ष या वयोगटातील होत्या. या महिलांचे वय, शैक्षणिक पात्रता, वैवाहिक स्थिती, कुटुंब प्रकार, सदस संख्या, व्यवसाय, जमीन धारणा, वार्षिक उत्पन्न, संस्था सहभाग अशा बाबींचा अभ्यास करण्यात आला.या महिलांची ग्रामपंचायत सभांमधील अनुपस्थितीच्या बाबतीत अभ्यास करण्यात आला, तेव्हा ८0 टक्के महिला सदस्यांनी मानधन कमी मिळत असल्याचा मुद्दा मांडला. मानधन कमी मिळत असल्याचे ११.६७ टक्के उपसरंपच व ८.३३ टक्के सरपंचांनीही मान्य केले. ग्रामसभेतील महिलांच्या अनुपस्थितीचे कारण शोधण्यासाठी अभ्यास करण्यात आला. महिला सदस्यांच्या अनुपस्थितीमागील सुक्ष्म कारणे लक्षात घेऊन, त्या संदर्भातील निष्कर्ष व शिफारशी शासनाला सादर केल्या होत्या. त्याला शासनाने मान्यता दिल्याने, यापुढे ग्रामसभेत महिलांचे प्रमाण वाढणार असल्याचे कृषीविद्यापीठाचे शिक्षण विस्तार विभागप्रमुख डॉ. दिलीप मानकर यांनी स्पष्ट केले.