शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : ४३९ विद्यार्थ्यांनी दिली विज्ञान मंच प्रवेशपूर्व परीक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 13:47 IST

राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूरतर्फे आयोजित विज्ञान मंच प्रवेशपूर्व परीक्षा रविवार, १५ सप्टेंबर रोजी न्यू इंग्लिश हायस्कूल येथे घेण्यात आली.

अकोला : राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूरतर्फे आयोजित विज्ञान मंच प्रवेशपूर्व परीक्षा रविवार, १५ सप्टेंबर रोजी न्यू इंग्लिश हायस्कूल येथे घेण्यात आली. ही परीक्षा जिल्ह्यातील ४३९ निवडक विद्यार्थ्यांनी दिली.विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाप्रती आवड निर्माण व्हावी, त्यांच्यातील बालवैज्ञानिक, नवनर्मिती समस्या निराकरण आणि विद्यार्थ्यांच्या ज्ञान लालसेला चालना मिळावी, या उद्देशाने दरवर्षी ही परीक्षा घेण्यात येते. एन.टी.एस. परीक्षेची पूर्वतयारी म्हणून ही परीक्षा घेतली जाते. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला चालना देण्यासाठी प्रत्येक विद्यालयातील प्रज्ञावंत विद्यार्थी या परीक्षेला पात्र ठरतात. या प्रवेशपूर्व परीक्षेमधून गुणवत्तेनुसार ग्रामीण भागातील ४० व शहरी भागातील ३० विद्यार्थ्यांची निवड विज्ञान मंच शिबिरासाठी केली जाते. निवड झालेल्या प्रतिभावंत बाल वैज्ञानिकांना विज्ञानातील व्याख्याने, प्रयोग दिग्दर्शन प्रश्नमंजूषा, अपूर्व विज्ञान मेळावा, वैज्ञानिकांची भेट व चर्चा, राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा यासारख्या विषयांवर मार्गदर्शन केले जाते. यावर्षी जिल्ह्यातून ४३९ निवडक विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र ठरले होते. त्यामध्ये अकोट व तेल्हारा तालुक्यातून लक्ष्मीबाई गणगणे विद्यालय, अकोट या केंद्रावर ११५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. बाळापूर, पातूर, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी, अकोला या तालुक्यातील ३२४ विद्यार्थ्यांनी न्यू इंग्लिश हायस्कूल, अकोला या केंद्रावर परीक्षा दिली. परीक्षेवेळी उपशिक्षणाधिकारी माध्यमिक दिनेश तरोळे, मुख्याध्यापक संघ अध्यक्ष बळीराम झामरे, सचिव दिनेश तायडे, प्राचार्य माधव मुनशी, विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. रवींद्र भास्कर यांनी परीक्षा केंद्राला भेट दिली. यावेळी केंद्र संचालक अंजली दंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. परीक्षेच्या यशस्वीतेसाठी गजानन निमकर्डे, मनीष निखाडे, ओरा चक्रे, शशिकांत बांगर, सुरेश किरतकर, संतोष जाधव, मुरलीधर थोरात, सुनील वावगे, मनोज तायडे, विलास कयले, श्रीकांत रत्नपारखी, मनोज वाकोडे, मंजुश्री लव्हाळे, रसिका जयस्वाल, वैशाली ढबाले, किरण राठोड, दीपिका आगरकर, रसिका मोहरील, सचिन ताडे, जयश्री भदे, सचिन वारकरी, कविता इंगळे यांच्यासह विज्ञान अध्यापक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.

 

टॅग्स :Akolaअकोलाexamपरीक्षाStudentविद्यार्थी