शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
5
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
6
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
7
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
9
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
10
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
11
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
12
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
13
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
14
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
15
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
16
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
17
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
18
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
19
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
20
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 

अकोला जिल्ह्यात २.३५ लाख महिलांच्या जन-धन खात्यात प्रतिमहा ५०० रुपये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2020 11:41 AM

प्रत्येकी प्रतिमहा ५०० रुपये सानुग्रह अनुदान जमा करण्याची प्रक्रिया २ एप्रिलपासून सुुरू करण्यात आली आहे.

अकोला : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात ‘लॉकडाउन’ लागू करण्यात आल्याच्या पृष्ठभूमीवर केंद्र शासनाच्या आदेशानुसार प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत महिलांच्या जन-धन बचत खात्यात एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांच्या कालावधीत प्रत्येकी प्रतिमहा ५०० रुपये सानुग्रह अनुदान जमा करण्याची प्रक्रिया २ एप्रिलपासून सुुरू करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील २ लाख ३५ हजार ९७ महिलांच्या जन-धन बचत खात्यात प्रतिमहा ५०० रुपयेप्रमाणे तीन महिन्यांच्या कालावधीत १ हजार ५०० रुपये सानुग्रह अनुदानाची रक्कम जमा करण्यात येणार आहे. कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी केंद्र शासनमार्फत देशभरात ‘लॉकडाउन’ जाहीर करण्यात आले आहे. त्यानुषंगाने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत जन-धन बचत खाते असलेल्या महिलांच्या बचत खात्यात एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांच्या कालावधीत प्रतिमहा प्रत्येकी ५०० रुपये सानुग्रह अनुदान जमा करण्याचा आदेश केंद्र शासनामार्फत देण्यात आला आहे. त्यानुसार महिलांच्या जन-धन बचत खात्यात ५०० रुपये अनुदानाची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया बँकांमार्फत २ एप्रिलपासून सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार जन-धन योजनेंतर्गत जिल्ह्यात बचत खाते असलेल्या जिल्ह्यातील २ लाख ३७ हजार महिलांच्या बचत खात्यात प्रत्येकी प्रतिमहा ५०० रुपये अनुदानाची रक्कम जमा करण्यात येणार आहे. एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांच्या कालावधीत महिलांच्या जन-धन बचत खात्यात एकूण १ हजार ५०० रुपये अनुदानाची रक्कम जमा करण्यात येणार आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी ‘सोशल डिस्टन्सिंग’ राखण्याकरिता अनुदानाची रक्कम काढण्यासाठी बँकांमध्ये गर्दी होऊ नये, यादृष्टीने पैसे काढण्यासाठी वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. तसेच ९ एप्रिलनंतर केव्हाही लाभार्थींना बँकेतून पैसे काढता येणार आहेत.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या ‘लॉकडाउन’च्या पृष्ठभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत महिलांच्या जन-धन बचत खात्यात प्रतिमहा ५०० रुपये सानुग्रह अनुदान जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. जिल्ह्यातील २ लाख ३५ हजार महिलांच्या जन-धन बचत खात्यात एप्रिल, मे व जून या तीन महिन्यात प्रतिमहा ५०० रुपयेप्रमाणे अनुदानाची रक्कम जमा होणार आहे. अनुदानाची रक्कम काढण्यासाठी बँकांमध्ये गर्दी होऊ नये, यासाठी पैसे काढण्यासाठी वेळापत्रक तयार करण्यात आहे.-आलोक तारेणिया व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक

 

टॅग्स :Akolaअकोलाbankबँक