ऐन नवरात्रोत्सवात ६६ रेल्वे गाड्या रद्द, अकोला स्थानकावरून जाणाऱ्या २८ गाड्यांचा समावेश

By Atul.jaiswal | Published: September 21, 2022 05:38 PM2022-09-21T17:38:36+5:302022-09-21T17:39:18+5:30

सणासुदीत प्रवाशांच्या अडचणीत वाढ

Ain Navratri 66 trains canceled, including 28 trains going from Akola station | ऐन नवरात्रोत्सवात ६६ रेल्वे गाड्या रद्द, अकोला स्थानकावरून जाणाऱ्या २८ गाड्यांचा समावेश

ऐन नवरात्रोत्सवात ६६ रेल्वे गाड्या रद्द, अकोला स्थानकावरून जाणाऱ्या २८ गाड्यांचा समावेश

Next

अकोला: दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या बिलासपूर विभागातील रायगड आणि झारसुगुडा स्थानकांदरम्यान चौथ्या मार्गाच्या बांधकामासाठी २२ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत प्री-एनआय आणि एनआय (नॉन इंटरलॉकिंग) काम करण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या ६६ गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये अकोला स्थानकावर थांबा असलेल्या २८ गाड्यांचाही समावेश असल्याने सणासुदीच्या काळात प्रवाशांच्या अडचणी वाढणार आहेत. या सर्व गाड्या २२ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या वेगवेगळ्या तारखांना प्रभावित होतील.

या महिन्याच्या सुरुवातीला ३० हून अधिक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. आता पुन्हा ६६ गाड्या एकाच वेळी रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वेनेही ट्रेन रद्द करण्यामागचे कारण दिले आहे. रेल्वेचे म्हणणे आहे की रायगड-झारसुगुडा सेक्शनच्या ईबी स्टेशनवर चौथ्या लाईन कनेक्टिव्हिटीसाठी प्री-नॉन-इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंगचे काम २२ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान केले जाईल, त्यामुळे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

कोणती गाडी कोणत्या तारखेला रद्द?

  • १२१३० हावडा-पुणे - २१ ते २८ सप्टेंबर
  • १२१२९ पुणे-हावडा - २१ ते २८ सप्टेंबर
  • १२८१० हावडा-सीएसएमटी - २१ ते २८ सप्टेंबर
  • १२८०९ सीएसएमटी-हावडा - २१ ते २८ सप्टेंबर
  • १२८६० हावडा-सीएसएमटी - २२ ते २९ सप्टेंबर
  • १२८५९ सीएसएमटी-हावडा - २१ ते २८ सप्टेंबर
  • १८०३० शालीमार-एलटीटी - २१ ते २८ सप्टेंबर
  • १८०२९ एलटीटी-शालीमार - २१ ते २८ सप्टेंबर
  • २२८४६ हटीया-पुणे - २३ व २६ सप्टेंबर
  • २२८४५ पुणे -हटिया - २५ व २८ सप्टेंबर
  • १२८८० भुवनेश्वर -एलटीटी - २२, २६ व २९ सप्टेंबर
  • १२८७९ एलटीटी -भूवनेश्वर - २४, २८ सप्टेंबर व १ ऑक्टोबर
  • १२९०५ पोरबंदर -शालिमार - २१,२२,२८ व २९ सप्टेंबर
  • १२९०६ शालिमार- पोरबंदर - २३,२४,३० सप्टेंबर व १ ऑक्टोबर
  • २२९०५ ओखा - शालीमार - २५ सप्टेंबर
  • २२९०६ शालीमार - ओखा - २७ सप्टेंबर
  • १३४२५ माल्दा टाऊन - सुरत - २४ सप्टेंबर
  • १३४२६ सुरत - माल्दा टाऊन - २६ सप्टेंबर
  • १२१५१ एलटीटी -शालीमार - २१, २२ व २८ सप्टेंबर
  • १२१५२ शालीमार-एलटीटी - २३, २४ व ३० सप्टेंबर
  • २२८९४ हावडा-साईनगर शिर्डी - २२ व २९ सप्टेंबर
  • २२८९५ साईनगर शिर्डी-हावडा - २४ सप्टेंबर व १ ऑक्टोबर

Web Title: Ain Navratri 66 trains canceled, including 28 trains going from Akola station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.