शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विद्यापीठाचे ८३ कर्मचारी अखेर बडतर्फ!

By admin | Updated: October 15, 2014 00:43 IST

कृषी विद्यापीठाचा नाकर्तेपणा भोवला; कर्मचा-यांचा आरोप कुलसचिव कार्यालयात ठिय्या.

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ८३ कर्मचार्‍यांच्या बडतर्फीवर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्यानंतर, कृषी विद्यापीठ प्रशासनाने या कर्मचार्‍यांच्या बडतर्फीचे आदेश बजावले आहेत. सहा महिन्याच्या आत भरती प्रक्रिया राबवून, या कर्मचार्‍यांना प्राधान्य द्यावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले असताना, या कृषी विद्यापीठाने भरती प्रक्रिया राबविली नाही. कृषी विद्यापीठाचा हा नाकर्तेपणा आम्हाला भोगावा लागत असल्याचा आरोप करून, बडतर्फ कर्मचार्‍यांनी मंगळवारी कुलसचिव कार्यालयात ठिय्या दिला. उच्च न्यायालयाने अकोल्याच्या कृषी विद्यापीठातील वरिष्ठ संशोधन आणि कनिष्ठ संशोधन सहाय्यक पदावरील ८३ कर्मचार्‍यांच्या बडतर्फीवर शिक्कामोर्तब केल्यानंतर, या कर्मचार्‍यांनी न्यायासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. विद्यापीठाने नव्याने भरती प्रक्रिया राबवून, सर्व वरिष्ठ व कनिष्ठ संशोधन सहाय्यकांना भरती प्रक्रियेत गुणवत्तेनुसार सामावून घ्यावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने ४ एप्रिल २0१४ रोजी या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान दिले होते. सहा महिन्यांच्या आत भरती प्रक्रिया राबवून, सर्व कर्मचार्‍यांना वयोर्मयादेची शिथिलता देणे अनिवार्य असताना, कृषी विद्यापीठाला निर्णयाचे गांभीर्यच कळले नाही. विद्यापीठाने केवळ जाहिरात प्रसिद्ध करू न उमेदवारांकडून अर्ज जमा केले; परंतु भरती प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यानंतर कर्मचारी भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी, या मागणीसाठी कृषी विद्यापीठ प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती; परंतु कृषी विद्यापीठाच्या अकार्यक्षमतेवर ताशेरे ओढत सर्वोच्च न्यायालयाने मुदतवाढ देण्यास नकार दिला आणि उच्च न्यायालयाने दिलेला आदेश कायम ठेऊन, सर्व कर्मचार्‍यांना बडतर्फ केले आहे. याला विद्यापीठ प्रशासन कारणीभूत असल्याचा आरोप कर्मचार्‍यांनी केला आहे. १५ वर्ष या कृषी विद्यापीठात नोकरी केली, संशोधन केले, विद्यार्थ्यांना शिकवले, आता वयाची चाळीशी ओलांडली, नोकरीची वयोर्मयादा ओलांडल्याने कुटुंब उघड्यावर पडली आहेत, असा आरोप कर्मचार्‍यांकडून होत आहे. कृषी विद्यापीठ प्रशासनाने तातडीने यावर निर्णय घेऊन, दिलासा द्यावा, अशी मागणी कर्मचार्‍यांनी कृषी विद्यापीठ प्रशासनाला केली आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर कृषी विद्यापीठाला बडतर्फीचे आदेश बजावणे क्रमप्राप्त होते; परंतु असे असले तरी कर्मचार्‍यांप्रती विद्यापीठ प्रशासनाची सहानभुती आहे. भरती प्रक्रिया राबविण्याच्या दृष्टीने कृषी विद्यापीठ प्रशासनाने पावले उचलली असून, या प्रकरणी कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू ंनी राज्यपालांची भेट घेतली असल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एम. भाले यांनी सांगीतले.