शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील विद्यार्थ्यांचा कृषी शिक्षणाकडे कल !

By admin | Updated: August 20, 2016 02:45 IST

साडेचौदा हजार जागांसाठी ६९ हजार अर्ज; प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात.

राजरत्न सिरसाटअकोला, दि १९ : राज्यातील विद्यार्थ्यांचा कृषी शिक्षणाकडे कल वाढत असून, यावर्षी बीएससी कृषी प्रथम वर्षासाठी उपलब्ध असलेल्या १४,७४७ जागांसाठी तब्बल ६९ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले आहेत. कृषी अभ्यासक्रमासाठी स्पर्धा वाढल्याने राज्यातील चारही कृषी विद्यापीठात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या रांगा लागल्या आहेत. २३ केंद्रांवर सुरू असलेली ही प्रवेश प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे.राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतर्गत शासकीय २,७७४ जागा आहेत तर खासगी कृषी महाविद्यालयांतर्गत १२ हजार विद्यार्थी प्रवेश क्षमता आहे. अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत शासकीय ७५५ तर खासगी महाविद्यालयाची २,३४0 एवढी प्रवेश क्षमता असून,अहमदनगर जिल्हय़ातील राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातील ८४४, खासगी ४,५७0, परभणीच्या स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत ७९२, खासगी महाविद्यालय आणि कोकणात दापोली येथे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची ३५६ तर खासगी महाविद्यालयाची प्रवेश क्षमता १,५५0 एवढी आहे.कृषी पदवीसाठी कृषी अभियांत्रिकी, उद्यानविद्या शास्त्र, वनविद्या शास्त्र, कृषी जैव तंत्रज्ञान, कृषी व्यवसाय व्यवस्थापन यासह अनेक विषय आहेत. यामध्ये कृषी या विषयासाठी विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा आहे. राज्यात कृषी अभ्यासक्रमाची ९२ महाविद्यालये असून, १९ शासकीय तर ७३ महाविद्यालये खासगी आहेत. शासकीय महाविद्यालयांची प्रवेश क्षमता २ हजार १२ तर खासगी महाविद्यालयांची प्रवेश क्षमता ही ७,२९0 एवढी आहे. म्हणजेच एकूण १४,७४७ जागांमध्ये ९,३0२ जागा कृषीच्या आहेत. प्रवेश प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी व स्पॉट अँडमिशनसाठी यावर्षी खासगी शासकीय महाविद्यालयांना जोडण्यात आली आहेत. येत्या तीन दिवसात प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. याकरिताच खासगी महाविद्यालयाचे प्रवेश कृषी विद्यापीठांच्या शासकीय महाविद्यालयातून केले जात आहेत.