शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विद्यापीठातील कर्मचार्‍यांचे आंदोलन सुरूच

By admin | Updated: July 29, 2014 20:26 IST

एक महिन्यानंतर ट्रॅक्टरने पेरणीला सुरुवात

अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे २५ मजूर संपावर गेल्याने कृषी विद्यापीठाच्या साडेतीन हजार एकरावरील पेरण्यांचे काम खोळंबले असताना कृषी विद्यापीठाच्या ट्रॅक्टरचालकांना समजावण्यास विद्यापीठाला यश आल्याने पेरणीला सुरुवात झाली आहे. संपावर तोडगा काढण्यासाठी कृषी विद्यापीठाचे अधिकारी कर्मचार्‍यांना घेऊन मुंबईला गेले आहेत. रोजंदारी मजुरांना योग्य मजुरी देण्यात यावी, ट्रॅक्टरचालक व प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांची पूर्तता करावी, या मागणीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कर्मचारी २५ जूनपासून संपावर गेले आहेत. या काम बंद आंदोलनामुळे विद्यापीठ प्रक्षेत्रावरील मशागत व पेरणीची कामे ठप्प पडली आहेत. विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात घाण साचली आहे. पशुसंवर्धन विभाग व प्रत्येक विभागातील गोठय़ात गुरांचे शेण साचले आहे. पाऊस सुरू झाल्यामुळे अकोला येथील मध्यवर्ती संशोधन विभाग व वणी रंभापूर येथील मुख्य बीजोत्पादन क्षेत्रावरील जवळपास साडेतीन हजार हेक्टरवरील मशागतीची कामे ठप्प पडली आहे. ट्रॅक्टर, वाहनचालकांना ५00 रुपये, रोजंदारी मजुरांना नवीन रोजंदारी वेतनाप्रममाणे ३५0 रुपये देण्यात यावेत, वाहनचालकांची भरती करताना ती केवळ कृषी विद्यापीठांतर्गतच करावी, नवीन प्रकल्पग्रस्तांना कामावर घेण्यात यावे, स्वेच्छेने काम सोडणार्‍या कर्मचार्‍यांना उपदानाची रक्कम लवकर देण्यात यावी आदी मागण्यांसाठी या कर्मचार्‍यांचे आंदोलन सुरू आहे. कर्मचारी कामावर परत येत नसल्यामुळे कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञ, अधिकार्‍ंयाना प्रत्येक विभागावर गस्त घालावी लागत आहे. त्यासाठी या शास्त्रज्ञ, अधिकार्‍यांच्या पाळ्य़ा ठरविण्यात आल्या आहेत. दरम्यान, ट्रॅक्टरचालकांच्या सहकार्याच्या भूमिकेमुळे पेरणीच्या कामांना मात्र सुरुवात झाली आहे.