शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

पश्‍चिम व-हाडात १00 उमेदवारी अर्ज बाद

By admin | Updated: September 30, 2014 01:04 IST

अकोला, वाशिम, बुलडाणा जिल्ह्यातील १00 उमेदवारी अर्ज बाद.

अकोला : पश्‍चिम वर्‍हाडातील तीन जिल्ह्यांमधील १५ विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारांचे १00 अर्ज छाननी प्रक्रीयेमध्ये बाद करण्यात आले.अकोला जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये २१ उमेदवारांचे ३९ अर्ज विविध कारणांमुळे बाद झाले. यात प्रामुख्याने पक्षाच्या अधिकृत उमेदवारासोबत डमी अर्ज सादर करणार्‍यांचा समावेश आहे. अकोला जिल्ह्यात आकोट, अकोला पश्‍चिम, अकोला पूर्व, बाळापूर आणि मूर्तिजापूर या पाच मतदारसंघांमध्ये १८५ उमेदवारांनी २५८ अर्ज सादर केले. त्यापैकी ३९ अर्ज बाद झाल्याने, आता १६४ उमेदवारांचे २१९ अर्ज शिल्लक आहेत. अकोला पूर्व मधून ४ उमेदवारांचे ५ अर्ज रद्द झालेत. अकोला पश्‍चिममध्ये ४ उमेदवारांचे ६, आकोटमध्ये २ उमेदवारांचे ४, बाळापूरमध्ये ७ उमेदवारांचे २0 आणि मूर्तिजापूरमध्ये ४ उमेदवारांचे ४ अर्ज बाद झाले. पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करून, पक्षाचा एबी फॉर्म न जोडणार्‍या डमी उमेदवारांचा यामध्ये समावेश आहे. याशिवाय काही अपक्ष उमेदवारांचे अर्जही बाद झालेत. वाशिम जिल्ह्यातील वाशिम, रिसोड व कारंजा या तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये १९ उमेदवारांचे ३५ उमेदवार अर्ज बाद करण्यात आले. वाशिम विधानसभा म तदारसंघात १0 उमेदवारांचे १0 अर्ज, रिसोड मतदारसंघातील ४ उमेदवारांचे ८ अर्ज तर कारंजा मतदारसंघातील ५ उमेदवारांनी दाखल केलेले १७ उमेदवारी अर्ज विविध त्रुटींमुळे बाद करण्यात आले. आता या जिल्ह्यातील तीनही मतदारसंघांमध्ये १0५ उमेदवारांचे १७0 उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांमध्ये २६ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज विविध कारणामुळे रद्द करण्यात आले. इतर १६0 उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले. बुलडाणा विधानसभा मतदारसंघात १, चिखलीत ४, खामगावमध्ये ३, जळगाव जामोदमध्ये ५, मलकापूरमध्ये २, मेहकरमध्ये ११ अर्ज रद्द करण्यात आले. सिंदखेडराजा मतदारसंघात सर्व उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले.