विद्यार्थ्यांचे थर्मल स्कॅनिंग करून शाळेत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:14 IST2021-02-05T06:14:39+5:302021-02-05T06:14:39+5:30

फोटो: संत गजानन स्कूल येथे प्रजासत्ताक दिन पारस : संत गजानन इंग्लिश मीडियम स्कूल येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात ...

Admission to school by thermal scanning of students | विद्यार्थ्यांचे थर्मल स्कॅनिंग करून शाळेत प्रवेश

विद्यार्थ्यांचे थर्मल स्कॅनिंग करून शाळेत प्रवेश

फोटो:

संत गजानन स्कूल येथे प्रजासत्ताक दिन

पारस : संत गजानन इंग्लिश मीडियम स्कूल येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक मनोज लांडे व अध्यक्ष साहेबराव भरणे यांनी ध्वजारोहण केले. यावेळी सहाय्यक शिक्षक नीलेश सातव, शिवाजी पंडीतकर, सय्यद असलम, राजेश दिवनाले, सुफियान अहमद, तिलक भारंबे उपस्थित होते.

फोटो:

कृषी सभापतींची पशु वैद्यकीय दवाखान्याला भेट

दानापूर : दानापूर येथील पशु वैद्यकीय दवाखान्याला मंगळवारी कृषी व पशुसंवर्धन सभापती पंजाबराव वडाळ यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषदेच्या सदस्या दीपमाला रवींद्र दामधर, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर पुंडकर उपस्थित होते. सभापती पंजाबराव वडाळ यांनी दवाखान्याच्या दुरूस्तीसाठी १४ लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यास सांगितले. यावेळी प्रतिष्ठीत नागरिक शालीग्राम पुंडके, गोपाळ वीरघट, परशराम वीरघट, ग्रामपंचायत सदस्य योगेश येऊल, परिचर दीपक मेश्राम, रामदास घायल, सुरेश खंडेराव, गोपाल वीरघट, मोतीराम इंगळे, गणेश भुते, सुनीलकुमार धुरडे उपस्थित होते.

फोटो:

Web Title: Admission to school by thermal scanning of students