शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्हय़ातील चार बाजार समित्यांवर प्रशासक !

By admin | Updated: November 13, 2014 01:20 IST

अकोला बाजार समितीचे प्रशासक एच.डी. डोंगरे.

अकोला : जिल्ह्यातील चार कृषिउत्पन्न बाजार समित्या बरखास्त करण्यात आल्या असून, समित्यांवर तडकाफडकी प्रशासकांची नेमणूक करण्यात आली आहे. अकोला बाजार समितीच्या प्रशासकपदाचा भार एच. डी. डोंगरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.राज्यातील शंभरावर कृषिउत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ संपल्याने समित्यांवर प्रशासक नेमण्यात आले होते. तत्कालीन शासनाने प्रशासक काढून त्या ठिकाणी मंडळ स्थापन केले होते. या मंडळाच्या अध्यक्षपदी बाजार समित्यांच्या सभापतींची निवड केली होती. नवे सरकार विराजमान होताच विद्यमान सहकार व पणन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या बाजार समित्या बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. ते आदेश मंगळवारी सायंकाळी धडकले. जिल्हा सहाय्यक उपनिबंधकांनी या आदेशाची आज बुधवारी तातडीने अंमलबजावणी केली असून,अकोला,बार्शिटाकळी, मूर्तिजापूर आणि पातूर या चार बाजार समित्यांवर प्रशासकांची नव्याने नेमणूक केली आहे.अकोला बाजार समितीच्या प्रशासकपदाची सूत्रे पातूरचे सहायक तालुका निबंधक ए. डी. डोंगरे यांच्याकडे सोपविली आहेत. मूर्तिजापूर कृषिउत्पन्न बाजार समिवर डी. आर. पिंजरकर, बार्शिटाकळी बाजार समितीच्या प्रशासकपदी ओ. एस. साळुंखे, तर पातूर कृषिउत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकपदाची सूत्रे आर. आर. विटणकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत.*आता निवडणुकांची प्रतीक्षाजिल्ह्यातील या चार बाजार समित्यांच्या निवडणुका होऊन नवे संचालक मंडळ कार्यरत होईपर्यत प्रशासक राहणार आहेत. या निवडणुकांचा कार्यक्रम आला आहे. तथापि, सुरुवातीला सेवा सहकारी व सहकारांशी संबंधित इतर बाबींच्या निवडणुका झाल्यावर बाजार समितीच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत.

*अकोट, बाळापूर समित्यांना मुदतवाढ बाळापूर आणि अकोट कृषिउत्पन्न बाजार समित्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ दिलेली असल्याने या बाजार समित्यांवर संचालक मंडळ आहे. तेल्हारा कृषिउत्पन्न बाजार समितीवर संचालक मंडळ कार्यरत आहे. या संचालक मंडळाचा कार्यकाळ २0१६ पर्यंत आहे.