घरफोडीप्रकरणी आरोपीस कोठडी

By Admin | Updated: January 21, 2015 01:08 IST2015-01-21T01:08:24+5:302015-01-21T01:08:24+5:30

अकोट न्यायालयाने सुनावली २३ जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी.

Accused robbery case | घरफोडीप्रकरणी आरोपीस कोठडी

घरफोडीप्रकरणी आरोपीस कोठडी

आकोट : शहरात अकोला मार्गावर भरदिवसा घरफोडीच्या घटना १९ जानेवारीला दुपारी घडल्या. याप्रकरणी पकडलेल्या एका चोरट्याला २0 जानेवारी रोजी न्यायालयात हजर केले असता, २३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी दुसर्‍या चोरट्याचे नाव निष्पन्न झाले असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
स्थानिक पूर्वा अपार्टमेंट, गोकुळ कॉलनी, आसरा कॉलनी, वनश्री अपार्टमेंट या नागरी वस्त्यांमध्ये घरी कोणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घरांचे कुलूप तोडून मोठय़ा प्रमाणात सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम असा मुद्देमाल लंपास केला. याबाबत सै. हाशम सै. कासम यांच्या तक्रारीवरून आरोपी शे. सलीम शे. अफसर व अन्य एकाविरुद्ध भादंविच्या कलम ४५४, ३८0, ३४ अन्वये आकोट शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला मंगळवारी आकोट न्यायालयात हजर केले असता, २३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणातील दुसरा आरोपी रशीद शाह हमीद शाह याचे नाव निष्पन्न झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आकोट शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरी, घरफोडीचे प्रमाण वाढले असून, नागरिकांमध्ये असुरक्षितता पसरली आहे.

Web Title: Accused robbery case