शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यातील १८0 रेतीघाटांच्या लिलावास मंजुरी

By admin | Updated: December 9, 2014 00:39 IST

आयुक्तांकडून मंजुरी: बुधवारपासून सुरू होणार प्रक्रिया

अकोला: जिल्ह्यातील १८0 रेतीघाटांचा लिलाव करण्यास विभागीय आयुक्तांकडून सोमवारी मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे रेतीघाटांच्या लिलावाची प्रक्रिया बुधवार, १0 डिसेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सुरू करण्यात येणार आहे.गतवर्षी जिल्ह्यातील लिलाव करण्यात आलेल्या रेतीघाटांची मुदत गत ३0 सप्टेंबर रोजी संपुष्टात आली. यावर्षी रेतीघाटांचा लिलाव करण्यासाठी जिल्ह्यातील सातही तालुक्यातील १८८ रेतीघाटांचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या खनिकर्म विभागामार्फत विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आला होता. प्रस्तावित १८८ रेतीघाटांपैकी जिल्ह्यातील १८0 रेतीघाटांच्या लिलावास आणि लिलावाच्या निर्धारित किमतीस अमरावती विभागीय आयुक्तांकडून मंजुरी देण्यात आली. आयुक्तांकडून मंजुरी मिळाल्याच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील रेतीघाटांच्या लिलावाची प्रक्रिया १0 डिसेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या खनिकर्म विभागाकडून सुरू करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया २१ डिसेंबरपर्यंत चालणार आहे.*पर्यावरण विभागाची परवानगी बाकी!जिल्ह्यातील रेतीघाटांच्या लिलावाकरिता १८८ रेतीघाटांचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या खनिकर्म विभागाकडून राज्य पर्यावरण विभागाकडे सादर करण्यात आला आहे; मात्र पर्यावरण विभागाकडून परवानगी मिळणे अद्याप बाकी आहे. त्यानुषंगाने विभागीय आयुक्तांकडून मिळालेल्या मंजुरीनुसार पर्यावरण विभागाच्या मान्यतेला अधीन राहून, जिल्ह्यातील रेतीघाटांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.