आरती व अश्‍विनी विद्यापीठ खो-खो संघात

By Admin | Updated: December 24, 2014 00:00 IST2014-12-24T00:00:59+5:302014-12-24T00:00:59+5:30

अश्‍वमेध स्पर्धेतून दोघींची विद्यापीठ खो-खो संघात निवड.

Aarti and Ashwini University Kho-Kho team | आरती व अश्‍विनी विद्यापीठ खो-खो संघात

आरती व अश्‍विनी विद्यापीठ खो-खो संघात

अकोला : प्राजक्ता क्रीडा मंडळाच्या खेळाडू आरती नारायण कदम आणि अश्‍विनी श्रीपाद दंडे यांची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ खो-खो संघात निवड झाली. राजस्थानमधील उदयपूर येथे पाच जानेवारीपासून सुरू होणार्‍या अखिल भारतीय खो-खो स्पर्धेत दोघीही सहभागी होणार आहे. औरंगाबाद येथे २६ ते ३0 नोव्हेंबर याकालावधीत झालेल्या अश्‍वमेध स्पर्धेतून दोघींची निवड विद्यापीठ संघात झाली आहे. स्पर्धापूर्व सराव शिबिर अमरावती येथे २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. मंडळाचे अध्यक्ष सागर वनारसे, सचिव बिनदासपंत मेश्राम, संघव्यवस्थापक ओरा चक्रे, प्रशिक्षक स्वप्निल मांदळे, अखिल मांदळे, क्रीडा शिक्षक यू. टी.अंभोरे, पी. के. देशमुख यांचे मार्गदर्शन खेळाडूंना लाभले.

Web Title: Aarti and Ashwini University Kho-Kho team