शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

अंगणवाडी, शाळा, कारागृहात शासनाची तूर डाळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2018 12:37 AM

अकोला : नाफेडने खरेदी बंद केल्यानंतर राज्य शासनाने बाजार हस्तक्षेप योजनेतून खरेदी केलेल्या २५ लाख क्विंटलपेक्षाही अधिक तुरीवर प्रक्रिया करून ती डाळ स्वस्त धान्य दुकानांसोबतच शालेय पोषण आहार, अंगणवाड्या, कारागृहांनी विकत घेण्याचे आदेश राज्याच्या सहकार व पणन विभागाने दिले आहेत. त्यानुसार महाराष्ट्र को-ऑप. मार्केटिंग फेडरेशनकडे तूर डाळीची मागणी नोंदवणे सुरू झाले आहे. 

ठळक मुद्देबाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत खरेदी केलेल्या तुरीवर प्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : नाफेडने खरेदी बंद केल्यानंतर राज्य शासनाने बाजार हस्तक्षेप योजनेतून खरेदी केलेल्या २५ लाख क्विंटलपेक्षाही अधिक तुरीवर प्रक्रिया करून ती डाळ स्वस्त धान्य दुकानांसोबतच शालेय पोषण आहार, अंगणवाड्या, कारागृहांनी विकत घेण्याचे आदेश राज्याच्या सहकार व पणन विभागाने दिले आहेत. त्यानुसार महाराष्ट्र को-ऑप. मार्केटिंग फेडरेशनकडे तूर डाळीची मागणी नोंदवणे सुरू झाले आहे. राज्यात २0१६-१७ च्या खरीप हंगामात तुरीचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात झाले. आधी केंद्र शासनाने आधारभूत किंमत योजनेनुसार एप्रिल अखेरपर्यंत तूर खरेदी केली. त्यानंतरही शेतकर्‍यांकडे मोठय़ा प्रमाणात तूर शिल्लक असल्याने राज्य शासनाने बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत २५.२५ लाख क्विंटल तूर खरेदी केली. त्या तुरीची भरडाई करून विक्री करण्याचे शासनाने ठरविले. त्यानुसार राज्य शासनाच्या विविध विभागांच्या योजनांसाठी लागणारी तूर डाळ ठरलेल्या किमतीत घ्यावी लागणार आहे. एक किलोच्या पॅकिंगसाठी ८0 रुपये तर ५0 किलोच्या पॅकिंगसाठी ७५ रुपयेप्रमाणे ३७५0 रुपये आकारले जाणार आहेत. शासनाच्या या निर्णयानुसार शालेय शिक्षण विभागाला पोषण आहारासाठी तीन लाख क्विंटल, वैद्यकीय शिक्षण व औषधे द्रव्ये विभागाला २१६0 क्विंटल, महिला व बालविकास विभागाच्या अंगणवाड्यांमध्ये ३ लाख ६0 हजार ६00 क्विंटल तूर डाळीचा पुरवठा केला जाणार आहे. उर्वरित डाळ गृहविभागाकडून कारागृहे, राज्य राखीव पोलीस दल, आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहांनीही खरेदी करावी, त्यासाठी ठरलेल्या दराप्रमाणे डाळीचा पुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र को-ऑप. मार्केटिंग फेडरेशनकडे मागणी नोंदवण्याचेही बजावण्यात आले आहे. 

खुल्या बाजारात ५५ रुपये किलोकेंद्र शासनाकडून तूर डाळीच्या किमती खुल्या बाजारात स्थिर ठेवण्यासाठी शासनाची तूर डाळ ५५ रुपये किलोप्रमाणे विकली जाणार आहे. खुल्या बाजारातील किमतीत परिस्थितीनुसार सुधारणा करण्याचे अधिकार मंत्रिमंडळाच्या उपसमितीला देण्यात आले आहेत. 

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMarket Yardमार्केट यार्डSchoolशाळा