अकोला जिल्ह्यात ६५६ कोविड खाटा शिल्लक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 10:29 AM2020-12-04T10:29:00+5:302020-12-04T10:31:33+5:30

Coronavirus in Akola केवळ १८३ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू असून, ६५६ खाटा रिक्त आहेत.

656 Covid beds vacant in Akola district! | अकोला जिल्ह्यात ६५६ कोविड खाटा शिल्लक!

अकोला जिल्ह्यात ६५६ कोविड खाटा शिल्लक!

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात ८३९ खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. ७८ टक्के रुग्ण घरीच उपचार घेत आहेत.

अकोला: दिवाळीनंतर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढीचा आलेख पुन्हा वाढू लागला असून, ॲक्टिव्ह रुग्णांचा आकडा ५९३ वर पोहाेचला आहे. कोविड रुग्णांसाठी जिल्ह्यात ८३९ खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यापैकी केवळ १८३ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू असून, ६५६ खाटा रिक्त आहेत. जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात कोरोनाने धुमाकूळ घातला होता. रुग्णसंख्या वाढीसोबतच मृत्यूचा आकडाही वाढत होता. दरम्यान, ऑक्टोबर महिन्यात रुग्णसंख्या वाढ मोठ्या प्रमाणात नियंत्रणात आली होती. साधारणत: दीड महिने कोरोना रुग्णसंख्या वाढ नियंत्रणा होती; मात्र दिवाळीनंतर रुग्णसंख्या वाढीस पुन्हा सुरुवात झाली. दिवाळीनंतर १५ दिवसांतच ॲक्टिव्ह रुग्णांचा आकडा ६०० च्या वर पोहोचला होता. सध्या हा आकडा ५९३ असून, यापैकी केवळ १८३ रुग्ण कोविड रुग्णालयात उपचार घेत आहेत. कोविड रुग्णांसाठी जिल्ह्यात ८३९ खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यापैकी ६५६ खाटा रिक्त आहेत. तर ७८ टक्के रुग्ण घरीच उपचार घेत आहेत.

कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी आरोग्य विभाग सतर्क आहे. मुबलक प्रमाणात खाटांची उपलब्धता आहे. बहुतांश रुग्ण होम क्वारंटीनमध्ये असून, त्यांचीही प्रकृती ठीक आहे.

- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला

Web Title: 656 Covid beds vacant in Akola district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.