शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

दिवसभरात ४३१ पॉझिटिव्ह, दोघांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:34 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २११६ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३४४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ...

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २११६ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३४४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १७७२ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये जीएमसी येथील १६, डाबकी रोड व कौलखेड येथील प्रत्येकी १३, मोठी उमरी येथील १२ व बार्शीटाकळी येथील ११, दोनद व गोरक्षण रोड येथील प्रत्येकी आठ, कॉंग्रेस नगर, जठारपेठ व वडाळी देशमुख येथील प्रत्येकी सात, हिंगणा रोड, सिंधी कॅम्प, बार्शीटाकळी येथील प्रत्येकी सहा, आदर्श कॉलनी, राऊतवाडी व मूर्तिजापूर येथील पाच, बाळापूर, सहकारनगर, आळसी प्लॉट, तापडीया नगर व खदान येथील प्रत्येकी चार, खोलेश्वर, लहानउमरी, अकोट,जवाहर नगर, विद्या नगर, गायगाव, न्यू राधाकिसन प्लॉट व गड्डम प्लॉट येथील प्रत्येकी तीन, पिंजर बार्शीटाकळी, राम नगर, संत नगर, सिव्हील लाईन, मलकापूर, यशवंत नगर, गांधी चौक, गीता नगर, कावसा, देवरावबाब चाळ, न्यू भागवत प्लॉट, न्यू तापडीया नगर, विठ्ठल नगर, जेतवन नगर व पार्वती नगर येथील प्रत्येकी दोन, मार्डी, कान्हेरी सरप, राहीत बार्शीटाकळी, मूर्तिजापूर, आंबेडकर नगर, गुलजारपुरा, शिव नगर, क्वॉटर, संतोष नगर, कीर्ती नगर, गोडबोले प्लॉट, सेन नगर, सस्ती पातूर, ताजनापेठ, मित्रा नगर, श्रावगी प्लॉट, हिंगणा फाटा, विद्युत कॉलनी, मराठा नगर, रजपूतपुरा, नवरंग सोयायटी, भीमनगर, बाळापूर रोड, दुर्गा चौक, हरिहरपेठ, मुकुंद नगर, राधे नगर, राधाकृष्ण टाकीज, पिंपळखुटा, महसूल कॉलनी, गायत्री नगर, इमरॉल्ड कॉलनी, स्टेशन, टाकली खोज, बाळापूर नाका, कृषी नगर, उमरा, रेणुका नगर, देशमुख फैल, आश्रय नगर, तोष्णीवाल लेआऊट, पोलीस हेडक्वॉटर, मलकापूर, दत्ता कॉलनी, शास्त्री नगर, माधव नगर, हनुमान वस्ती, तेल्हारा, जुने शहर, गुडधी, न्यू तापडीया, लखमापूर टाकळी, डोंगरगाव, नयागाव, मालीपुरा, व्हीआयपी कॉलनी, नवीन गोडबोल प्लॉट येथील प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश आहे.

सायंकाळी तळेगाव डवला येथील १३, खंडाळा येथील नऊ, सालतवाडा येथील सहा, देशमुख कॉलनी, मलकापूर, जुने शहर व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी तीन, तेल्हारा, मूर्तिजापूर, देवळी, वानखडे नगर, महाजनी प्लॉट येथील प्रत्येकी दोन, इसापूर ता.तेल्हारा, भांबेरी, सवळ, वाडी अदमपूर ता.तेल्हारा, हरी नगर उमरी, आदर्श कॉलनी, द्वारका नगरी, मूर्तिजापूर रोड, देशमुख फैल, शास्त्री नगर, खोलेश्वर, गोकुळ कॉलनी, खिरपुरी, खडकी, सदारपूर, अडगाव, भागीरथ नगर, गंगाधर प्लॉट, सिव्हील लाईन, गोरेगाव, ज्ञानेश्वर नगर, लकडगंज, शिवनगर, हिंगणा फाटा, रामदासपेठ, जयहिंद चौक व शिवाजी नगर येथील प्रत्येकी एक रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

महिला व पुरुषाचा मृत्यू

कोरोनावर उपचार घेत असलेल्या बोरगाव मंजू येथील एका ३३ वर्षीय महिला रुग्णाचा बुधवारी मृत्यू झाला. या महिलेस २७ फेब्रुवारी रोजी दाखल केले होते. सायंकाळी पवन वाटिका, खरप येथील ६६ वर्षीय पुरुषाचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांना २० फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आले होते.

२७६ जणांना डिस्चार्ज

दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३१, बिहाडे हॉस्पिटल येथील सात, ओझोन हॉस्पिटल येथील सहा, सूर्यचंद्र हॉस्पिटल येथील पाच, आयकॉन हॉस्पिटल येथील एक, हॉटेल रिजेन्सी येथील चार, युनिक हॉस्पिटल येथील दोन, तर होम आयसोलेशन येथील २२० अशा एकूण २७६ जणांना बुधवारी डिस्चार्ज देण्यात आला.

३,९१० ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १७,४४६ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल १३,१६२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३७४ जणांचा मृत्यू झाला असून सद्यस्थितीत ३,९१० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.