शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

२५ हजार कैदी राहणार मतदानापासून वंचित!

By admin | Updated: October 12, 2014 23:44 IST

कोठडी, तडीपार व स्थानबद्ध आरोपींना मात्र टपाल मतप्रतिकेद्वारे मतदानाचा अधिकार.

नितीन गव्हाळे/अकोलाराज्यघटनेनुसार शिक्षा झालेले कैदी आणि न्यायाधीन (न्यायालयीन कोठडीत) कैद्यांना मतदानाचा ह क्क नसल्याने, राज्यातील ४३ कारागृहांमधील २५ हजार ७५६ कैद्यांना १५ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी होणार्‍या मतदानापासून वंचित राहावे लागणार आहे. निवडणूक प्रक्रिया लोकशाहीचा अविभाज्य भाग असून, घटनेने प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार दिला; परंतु वेगवेगळय़ा गुन्ह्यांमध्ये कारागृहात बंदिस्त असलेले न्यायाधीन बंदी आणि सिद्धदोष बंदी असलेल्या कैद्यांना मतदान करण्याचा हक्क नाकारण्यात आला आहे. घटनेत दिलेल्या प्रतिनिधित्व कायदा १९५१ नुसार कैद्याला मतदान प्रक्रियेमध्ये भाग घेता येत नाही. कैद्याची जामिनावर सुटका झाल्यास त्याला मतदान करता येते. मध्यवर्ती कारागृह ९, महिला कारागृह १, किशोर सुधारालय १, खुले कारागृह ५, जिल्हा कारागृह २५, स्वातंत्र्यपूर्व कॉलनी कारागृह १ आणि विशेष कारागृह १, अशी राज्यात एकूण ४३ कारागृहे आहेत. या कारागृहांमधील २५ हजार ७५६ कैद्यांना मतदानापासून वंचित राहावे लागणार आहे. *कोठडी, तडीपार व स्थानबद्ध आरोपींना अधिकारविविध गुन्हय़ांतर्गत पोलिसांनी अटक करून कोठडीत टाकलेले आरोपी, तडीपार केलेले व स्थानबद्ध केलेल्या आरोपींना टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानाचा हक्क बजावण्याचा अधिकार आहे. अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी पोलिस कोठडीत असलेले, तडीपार व स्थानबद्ध केलेल्या आरोपींनी निवडणूक विभागाकडे म तदानासाठी अर्ज केल्यास, ते टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करू शकत असल्याचे नमूद केले. मात्र गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील आरोपी न्यायालयीन कोठडीत असतील किंवा शिक्षा भोगत असतील, तर लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार त्यांना मतदानाचा हक्क बजाविता येत नसल्याचे जिल्हा मध्यवर्ती कारागृहाचे तुरुंग अधीक्षक ज्ञानेश्‍वर जाधव यांनी स्पष्ट केले.