शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

शहर विकासासाठी २५ कोटी मंजूर

By admin | Updated: August 25, 2015 02:54 IST

भाग्य उजळले; सिमेंट काँक्रीटचे रस्ते, बगिच्यांचे होणार सौंदर्यीकरण

आशीष गावंडे / अकोला : महापालिका क्षेत्रातील मुख्य रस्त्यांचे काँक्रिटीकरण व डांबरीकरणासाठी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तब्बल २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मनपासह राज्यात भाजप-सेना युतीचे सरकार स्थापन झाल्यापासून प्रथमच अकोला शहरासाठी एवढय़ा मोठय़ा प्रमाणात निधी प्राप्त होणार असल्याचे दिसून येते. आमदार गोवर्धन शर्मा, आ.रणधीर सावरकर यांना विशेष बाब म्हणून सदर निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती आहे. मनपाचे तत्कालीन आयुक्त दीपक चौधरी यांच्या कार्यकाळात २0१३ मध्ये अतवृष्टीमुळे दुरवस्था झालेल्या रस्ते दुरुस्तीसाठी तत्कालीन काँग्रेस सरकारने १५ कोटींचे अनुदान दिले होते. या अनुदानातून प्रमुख १८ मार्गांची कामे प्रगतीपथावर आहेत. असे असले तरी शहरातील इतरही प्रमुख रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाल्याचे चित्र आहे. ही बाब लक्षात घेता, प्रमुख रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी २५ कोटी रुपये विशेष निधी देण्याची मागणी आमदार गोवर्धन शर्मा यांनी अधिवेशनात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली होती. यासंदर्भात आमदार सावरकर यांनीही मुख्यमंत्र्यांसह अर्थमंत्र्यांकडे सतत पाठपुरावा केला. त्यानुषंगाने शहरातील रस्त्यांचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश अर्थमंत्र्यांनी जिल्हाधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाला जून महिन्यात दिले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने विकास कामांचा प्रस्ताव तयार करून तो वित्त विभागाच्या अखत्यारित असलेल्या अंमलबजावणी संचालनालय विभागाकडे पाठवला. प्रस्ताव मंजूर होऊन अर्थमंत्र्यांनी त्यावर शिक्कामोर्तब करीत २५ कोटींचा निधी मंजूर केला. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात प्रथमच विकास निधी मंजूर झाल्याने शहरातील उर्वरित विकास कामे मार्गी लागतील, हे निश्‍चित झाले आहे.