शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

२०० मिली प्लाझ्मा युनिटचे दर ५५०० रुपये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 11:26 IST

सर्वोपचार रुग्णालयातील शासकीय रक्तपेढीतही नव्या मान्यतेनुसार दर आकारणी केली जाणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांकडून मिळत आहे.

अकोला : करोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या प्लाझ्माच्या २०० मिलीच्या एका बॅगसाठी साडेपाच हजार रुपयांचा दर आकारण्यात येणार आहे. खासगी, विश्वस्त रक्तपेढ्या तसेच रुग्णालयांना राज्याच्या आरोग्य विभागाने या दर आकारणीसंदर्भात मान्यता दिली आहे. त्यानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयातील शासकीय रक्तपेढीतही नव्या मान्यतेनुसार दर आकारणी केली जाणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांकडून मिळत आहे.राज्यात विविध ठिकाणी खासगी व विश्वस्त रक्तपेढ्यांकडून प्लाझ्मा थेरेपीसाठी आवश्यक प्लाझ्मा बॅगसाठी अवाजवी शुल्क आकारले जात असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर रुग्णांना किफायतशीर दरात प्लाझ्मा उपलब्ध व्हावा, प्लाझ्माची प्रती डोस किंमत निश्चित व्हावी यासाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेमार्फत तज्ज्ञ समिती नेमण्यात आली होती. समितीने ही दर निश्चिती केलेली आहे. त्यानुसार प्लाझ्मा बॅगसाठी ५,५०० रुपये आकारण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार आता अतिरिक्त दर कुणी आकारत असल्यास रकमेची परतेड करणे बंधनकारक आहे, अन्यथा कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.सात हजारांपर्यंत होते दरवैद्यकीय सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यात विविध ठिकाणी प्लाझ्माचे वेगवेगळे दर आकारण्यात आले आहेत. सुमारे ४ ते ७ हजार रुपयांपर्यंत प्रतिबॅग प्लाझ्मा देण्यात आला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातून खासगी रुग्णालयात दाखल रुग्णांसाठी ७ हजार रुपये प्रतियुनिट या दराने प्लाझ्मा देण्यात आल्याची माहिती विश्वसनीय वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.चाचण्यांचे दर वेगळेदरम्यान, नॅट चाचणीसह प्लाझ्मा बॅग उपलब्ध करून दिल्यास प्लाझ्मा बॅगेच्या किमतीशिवाय या चाचणीसाठी कमाल दर १,२०० रुपये प्रती चाचणी आकारण्यात येणार आहेत. तसेच केमिल्युमिनेसन्स तपासणी करून प्लाझ्मा बॅग दिल्यास त्यासाठी प्रती चाचणी कमाल दर ५०० रुपये आकारण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे.जीएमसीत २३ जणांनी केले प्लाझ्मा दानशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात आतापर्यंत २३ डोनरकडून प्लाझ्मा संकलित करण्यात आला आहे. २०० मिली प्रमाणे ४५ युनिटचे आतापर्यंत संकलन झाल्याची सूत्रांची माहिती आहे.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या