२ किलो चांदीची नाणी लंपास

By Admin | Updated: July 13, 2014 01:01 IST2014-07-13T01:01:30+5:302014-07-13T01:01:30+5:30

ज्वेलर्समधील २ किलो चांदीचे शिक्के ज्वेलर्समध्ये काम करणार्‍या एका महिलेने व युवकानेच लंपास

2 kg silver coins lump | २ किलो चांदीची नाणी लंपास

२ किलो चांदीची नाणी लंपास

अकोला: शहरातील गांधी रोडवरील खरोटे ज्वेलर्समधील २ किलो चांदीचे शिक्के ज्वेलर्समध्ये काम करणार्‍या एका महिलेने व युवकानेच लंपास केल्याची बाब शनिवारी दुपारी २ वाजता उघडकीस आली. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी एका महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल केला. खरोटे ज्वेलर्सचे संचालक शैलेश खरोटे यांनी शनिवारी कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, २६ जून रोजी त्यांच्या दुकानातील सोने-चांदीच्या दागिन्यांची तपासणी करून मोजणी केली. दरम्यान, त्यांना दुकानातील दोन किलो चांदीचे शिक्के लंपास झाल्याचे दिसून आले. त्यांनी दुकानातील कर्मचार्‍यांकडे चौकशी केली असता, एका महिलेचे व सचिन दांदळे याचे नाव समोर आले. या दोघांनी ही चांदीची नाणी सराफा व्यवसायी म्हणून काम करणारा डाबकी रोडवरील पंडित पाटील याला विकल्याचे स्पष्ट झाले. चांदीच्या नाण्यांची किंमत ८0 हजार रुपये आहे. ** कॅमेर्‍यामुळे चोरी उघडकीस दुकानातील सोने-चांदीच्या दागिन्यांची मोजणी केली असता, दोन किलो चांदीची नाणी कमी आढळून आली. चांदीची नाणी गेली कुठे, असा प्रश्न निर्माण झाला. शैलेश खरोटे यांनी सीसी कॅमेर्‍यांचे चित्रण तपासले असता, दोघा कर्मचार्‍यांनी चांदीचे शिक्के लंपास केल्याचे समोर आले. आरोपींची चौकशी केली असता, त्यांनी चोरीची कबुली दिली.

Web Title: 2 kg silver coins lump