शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प यांची अचानक उदारता कशासाठी?
2
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
3
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
4
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
5
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
6
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
7
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
8
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
9
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
10
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
11
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
12
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
13
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
14
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
15
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
16
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
17
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
18
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
19
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
20
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात सात महिन्यांत १८ हजार नवे रूग्ण

By admin | Updated: November 30, 2014 22:15 IST

आज जागतीक एडस निर्मूलन दिन

राजेश शेगोकार/बुलडाणाबी पॉझीटिव्ह असे म्हटले की दिलासा मिळतो, सकारात्मक विचार करण्याचा संदेश मिळतो; मात्र हाच ह्यपॉझीटिव्हह्ण शब्द एचआयव्ही चाचणीतून समोर आला तर संपूर्ण आयुष्यच उद्धवस्त झाल्याची भावना होते. अशा एचआयव्ही पॉझीटिव्ह रूग्णांसाठी शासन अनेक सुविधा देत असली तरी रूग्णांचा आकडा वाढताच आहे. गत एप्रिल ते ऑक्टोबर २0१४ या सात महिन्यांच्या काळात राज्यात तब्बल १८ हजार रूग्ण नव्याने आढळले असून एडस् निमुर्लनासाठी अजूनही व्यापक जनजागृतीची गरज असल्याची बाब यानिमित्ताने अधोरेखीत झाली आहे.गत सात महिन्यांमध्ये सामान्य व गरोदर माता रूग्णांची तपासणी केली असता १८ हजार ३५ रूग्ण एचआयव्ही पॉझीटिव्ह आढळले आहेत. सामान्य रूग्णांध्ये एक लाख ११ लाख ६३ हजार ७१७ रूग्णांची तपासणी केली असता, त्यामध्ये १७ हजार १८३ रूग्ण पॉझीटिव्ह आढळले आहेत. १0 लाख ६५ हजार १0 गरोदर महिलांपैकी ८५२ महिलांना एचआयव्हीची लागण झाली आहे. गरोदर महिलांसाठी व्यापक स्तरावर उपाययोजना सुरू आहेत. नियमित तपासणीमध्ये उपचारही वेळेवर दिले जातात. त्यामुळे तपासणी केलेले रूग्ण व प्रत्यक्षात लागण झालेले रूग्ण यांचे गुणोत्तर कमी आहे; मात्र सर्वसामान्य रूग्णांच्या बाबतीत आकडेवारी चिंताजनक आहे.एचआयव्हीची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संबधित रूग्णाला एआरटी केंद्रावर उपचारासाठी यावे लागते; मात्र अनेकदा रूग्ण भितीपोटी किंवा बदनामीपोटी एआरटी केंद्रावर तपासणीसाठी येत नाही. त्यामुळे एचआयव्ही पॉझीटिव्ह रूग्णांची संख्या वाढतीच असल्याचे मत बुलडाण्याचे एड्स नियंत्रण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रमोद टाले यांनी व्यक्त केले. रूग्णांनी योग्य उपचार घेतला तर त्यांना फायदा होतो व दैनंदिन जीवन जगतांना कुठलीही अडचण येत नाही. त्यामुळे अशा रूग्णांनी उपचाराकडे लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी केले.