शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
2
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
3
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
4
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
5
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
6
राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी
7
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
8
तुरुंगात 'प्रशिक्षण', साखळी बॉम्बस्फोटांचे नियोजन, लश्कर-ए-तोयबाशी संबंधित ७ दहशतवाद्यांना एनआयए न्यायालयाने सुनावली शिक्षा
9
’७० ते ८० टक्के नेते पो** पाहतात, सर्वांची चौकशी करा’, पप्पू यादव यांचं आव्हान
10
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
11
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
12
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
13
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
14
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
15
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
16
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
17
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
18
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
19
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
20
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
Daily Top 2Weekly Top 5

पातूर येथे अत्याधुनिक कोविड सेंटर उभारण्यासाठी १ कोटीचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:18 IST

अकोला: संसर्गजन्य कोरोना विषाणूमुळे कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. कोरोनामुळे जिल्हाभरात दररोज होणारे मृत्यू लक्षात घेता ...

अकोला: संसर्गजन्य कोरोना विषाणूमुळे कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. कोरोनामुळे जिल्हाभरात दररोज होणारे मृत्यू लक्षात घेता पातूर येथे अत्याधुनिक कोविड सेंटर उभारण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख यांनी १ कोटी रुपयांच्या निधीचे पत्र मंगळवारी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या स्वाधीन केले.

जानेवारी महिन्याच्या अखेरीपासून जिल्हाभरात कोरोना विषाणूची लाट आली आहे. कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढल्यामुळे घरोघरी कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळून येत आहेत. एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांना कोरोनाची लागण होत असल्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये खाटांची व ऑक्सिजनची कमतरता निर्माण होत आहे. यामुळे रुग्णांची फरपट होत असून त्यांना वेळेपूर्वी उपचार मिळत नसल्याने मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच या सर्व बाबींमुळे वैद्यकीय आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. या सर्व बाबी लक्षात घेता शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख, निवासी उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषदेचे गटनेता गोपाल दातकर, मनपातील गटनेता राजेश मिश्रा यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची भेट घेऊन जिल्हा प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती घेतली. यावेळी कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पातूर येथील वंदनाताई ढोणे आयुर्वेदिक महाविद्यालयात अत्याधुनिक कोविड सेंटर उभारण्यासाठी आमदार निधीतून १ कोटी रुपये मंजूर करण्याचे पत्र जिल्हाधिकारी पापळकर यांना देण्यात आले. एक कोटी रुपयातून अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांची तातडीने खरेदी केली जाणार असून त्याचा रुग्णसेवेसाठी लवकरच वापर केला जाईल, असे आश्‍वासन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यावेळी दिले.

* * * * * * * * *कोविडसाठी लोकप्रतिनिधींना १ कोटींचा निधी*

संसर्गजन्य कोरोनामुळे वैद्यकीय आरोग्य यंत्रणांवर अतिरिक्त ताण येत असल्याची बाब लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकप्रतिनिधींना कोविड संदर्भात उपाययोजना करण्यासाठी १ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्याला मंजुरी दिली आहे. त्या अनुषंगाने आमदार नितीन देशमुख यांनी जिल्हा प्रशासनाला निधी मंजूर करण्याचे पत्र दिले.

कोरोनाच्या धर्तीवर पातूर येथे आयसीयू कक्ष, आधुनिक खाटा, व्हेंटिलेटर, मॉनिटर्स, स्ट्रेचर, पेशंट ट्रॉली, व्हॅक्सिन बॉक्स, फ्रिज,ऑक्सिजन सिलिंडर आदी साहित्य खरेदी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. यामुळे रुग्णांसाठी सुविधा निर्माण होईल.

-नितीन देशमुख जिल्हाप्रमुख तथा आमदार शिवसेना